पागोटे प्रीमियर लीग-2026″ क्रिकेट सामने मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न..!

तरुण गर्जना वृत्तपत्र, पत्रकार, कैलासराजे घरत
खारपाडा पेण
“पागोटे प्रीमियर लीग-2026” क्रिकेट सामने मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न..!
पागोटे टेनिस क्लिकेट क्लब आयोजित “पागोटे प्रीमियर लीग 2026” क्रिकेट सामने पागोटे गावच्या हुतात्मा मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाले. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पागोटे गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ सामाजिक व राजकीय मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला यांच्या श्री गणेशाच्या प्रतिमेस पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास श्री प्रणित पाटील.
ॲड.भार्गव पाटील श्री.भूपेंद्र तांडेल, आलोक पाटील, निनाद पाटील, यश ठाकुर, प्रकाश भोईर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनोद पाटील, शिवम पाटील, नरेश कोळी, संदीप तांडेल यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
या क्रिकेट सामन्यांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.अरुण पाटील, आदिराज पाटील, सुजित तांडेल, विनय भोईर, चैतन्य पाटील, करण पाटील, मयुर पाटील, समीर पाटील, साईराज पाटील,गणेश पाटील, हेमंत पाटील, विश्वनाथ पाटील,दिनेश भोईर, साईराज भोईर, पंकज पाटील, विवेक भोईर, आलोक पाटील, अविनाश घरत, सुनील तांडेल, सुधीर तांडेल, रमेश पाटील, अतुल पाटील, विजय पाटील, सौरभ पाटील, ऋषिकेश पाटील, पोलिस मित्र संघटना सदस्य उरण आदी मान्यवर उपस्थित होते. व्यासपीठावर पुरोगामी पत्रकार संघाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख महाराष्ट्र भूषण-कोंकणरत्न पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत उपस्थित होते.आयोजकांच्या वतीने मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रीमियर लीगमध्ये एकूण ५ संघानी सहभाग घेतला होता. NP Creation या संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक मिळवत अंतिम विजेता ठरला. द्वितीय क्रमांक शिवशंभु चॅलेंजर हया संघाने पटकावला पागोटे प्रीमियर लीग मोठ्या आनंदाने संपन्न झाली.
मॅन ऑफ द मॅच-वैभव पाटील एन.पी.क्रियेशन,मॅन ऑफ द सिरीज-साहिल तांडेल कुवल एवेंजर, उत्कृष्ट गोलंदाज-करण पाटील एन.पी.क्रियेशन, उत्कृष्ट फलंदाज-वैभव पाटील बंटी, बेस्ट फील्डर-विकास शिंदे विजेते ठरले. स्पर्धेसाठी पंच म्हणून सुनील पाटील(वेश्वी), आत्माराम कोळी (कोंबडभुजे)यांनी काम पाहिले तसेच गुणलेखक-शिवम तांडेल, करण पवार, हर्षित पाटील म्हणून अतिशय सुरेख भूमिका बजावली. या क्रिकेट सामन्यात समालोचक पागोटे गावातील सुपुत्र उत्कृष्ट समालोचक निवेदक सूत्रसंचालक श्री विवेक पाटील व श्री प्रकाश ठाकुर सर(धुतूम) यांचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभले. व्यवस्थापक ग्रामस्थ मंडळ पागोटे सर्वांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने ही क्रिकेट स्पर्धा अतिशय जल्लोषात साजरी झाली. या स्पर्धांचे पागोटे उरण परिसरातील ग्रामस्थ युवा वर्गाकडून कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.




