महाराष्ट्र

पुरोगामी पत्रकार संघ नांदेड चे ज़िल्हा अध्यक्ष तथा उपसंपादक दिपक मठपती यांचे मागणी ला यश!

  1. पुरोगामी पत्रकार संघ नांदेड चे ज़िल्हा अध्यक्ष तथा उपसंपादक दिपक मठपती यांचे मागणी ला यश!

नांदेड (प्रतिनिधी )
नांदेडच्या विमानतळ रोडलगत विकसित होत असलेल्या गार्डनच्या रखडलेल्या विकासकामांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि तेथील अनेक समस्या, स्वच्छता, गार्डन ची दुरुस्ती आणि देखभाल बाबत दैनिक, यु ट्यूब, नांदेड न्यूज Live माध्यमातून अनेक वेळा आवाज उठवीला आहे, जवळ पास 6/7महिने कालावधीत आवाज उठून जनजागृती, कार्यकारी अभियंता यांचे कानावर सुद्धा ठाकले होते.सतत पाठपुरावा केला, तसे च दि. 30 जानेवारी 26 रोजी जेष्ठ पत्रकार आनंद कल्याणकर यांच्या 1दिवस लक्षणिक उपोषण स्वतः उपोषण मध्ये सहभागी होऊन पुरोगामी पत्रकार संघ नांदेड ज़िल्हा अध्यक्ष म्हणून पाठींबा दिला.महात्मा गांधी पुण्यतिथीच्या निमित्तानया उपोषणाला गार्डन विकासप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

चैतन्य नगर ते सांगवी रोड विकास कामासाठी दखल घेत प्रशासनाने विकासकामांना गती दिली असून सध्या गार्डनमध्ये विविध कामांचा सपाटा सुरू करण्यात आला आहे. येत्या महिन्यात गार्डनच्या संपूर्ण परिसरात संरक्षण जाळी बसवणे, फुलझाडांवर औषधी फवारणी करणे, नियमित सिंचन व्यवस्था कार्यान्वित करणे तसेच गार्डनमधील दबलेले व खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. उर्वरित कामे लवकरच पूर्ण करून हे गार्डन महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता मयूर कांबळे यांनी दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button