महाराष्ट्र

सरकारी कार्यक्रम, सरकारी शाळा यांमधील समारंभ आणि इतर औपचारिक कार्यक्रम यांमध्ये ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत गाणे अनिवार्य.!

पत्रकार कैलासराजे घरत
खारपाडा पेण, रायगड

सरकारी कार्यक्रम, सरकारी शाळा यांमधील समारंभ आणि इतर औपचारिक कार्यक्रम यांमध्ये ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत गाणे अनिवार्य.!
वंदे मातरम! जय हिंद !! जय भारत !!
• केंद्रीय गृह मंत्रालयाने घोषित केलेल्या नव्या नियमावलीनुसार आता सरकारी कार्यक्रम, सरकारी शाळा यांमधील समारंभ आणि इतर औपचारिक कार्यक्रम यांमध्ये ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत गायले जाणे अनिवार्य असणार आहे.
• 3 मिनिटे 10 सेकंदाच्या या राष्ट्रीय गीताच्या सन्मानार्थ सर्वांना उभे रहावे लागणार आहे. या गीतीची संपूर्ण 6 कडवी गायली जाणार असून त्यात श्रीदुर्गादेवीचा उल्लेखही असणार आहे.
• यापूर्वी केवळ 2 कडवी गायली जात होती. त्यासाठी केवळ 65 सेकंद लागत होती.
• झेंडा वंदन, राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे कार्यक्रम, त्यांचे भाषण आणि राष्ट्राला संबोधित करणे यांपूर्वीही राष्ट्रीय गीत वाजवले जाणार.
• राष्ट्रगीत (जन गण मन) आणि राष्ट्रीय गीत (वन्दे मातरम्) एकत्र वाजवायचे असल्यास आधी ‘वंदे मातरम’ आणि नंतर ‘जण गण मन’ गायले जाईल.
• सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि घटनात्मक संस्था यांना यासंबंधीचे निर्देश प्रसारित करण्यात आले आहेत. जय हिंद!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button