
पत्रकार कैलासराजे घरत
रायगड जिल्हा प्रतिनिधी.
*अष्टगंध सांस्कृतिक कलामंडळ उरण पूर्व विभागाचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला*
अष्टगंध सांस्कृतिक कलामंडळ, उरण पूर्व विभाग (नवी मुंबई) यांच्या पुढाकाराने बुधवार, दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला स्नेहमेळावा व पारंपरिक पोपटी पार्टी चिरनेर येथील मानसी फार्म हाऊस येथे अत्यंत आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला.
या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने कला, नाट्य, संगीत व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोंकणरत्न पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत तसेच जेष्ठ पत्रकार दत्ता म्हात्रे यांचे अष्टगंध सांस्कृतिक कलामंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन औपचारिक स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन अष्टगंध सांस्कृतिक कलामंडळ उरण पूर्व विभागाचे सन्माननीय अध्यक्ष अशोक म्हात्रे यांच्यासह लेखक व कलाकार श्री. हासुराम पाटील यांनी (काकासाहेब)केले होते. या कार्यक्रमास सुप्रसिद्ध गायक जयकिसन मोकल, दिग्दर्शक धनेश्वर म्हात्रे, आद्य नाटककार विद्याधर म्हात्रे, निर्माता रमेश कोळी, कृष्णकांत म्हात्रे, अलंकार कडू, समीर म्हात्रे, निखिल पाटील, नयन ठाकूर, रमाकांत घरत तसेच अष्टगंध मित्रपरिवारातील अनेक कलाकार, व रसिक उपस्थित होते.
या स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून कलाकार व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना परस्पर संवाद साधण्याची, अनुभवांची देवाणघेवाण करण्याची तसेच भविष्यातील सांस्कृतिक उपक्रमांबाबत सकारात्मक चर्चा करण्याची संधी मिळाली. आपुलकी, स्नेह व एकजुटीचे प्रतीक ठरलेला हा पोपटी पार्टीसह स्नेहमेळावा उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरला.




