महाराष्ट्र
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकारितेच्या इतिहासात नवे पर्व महिला नेतृत्वाखाली घडतोय परिवर्तनाच्या सुवर्णक्षण!
"सत्यासाठी झगडण्याची हिंमत,",, अन्यायाविरुद्ध निर्भीड उभे राहण्याची ताकद.,,, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा पाऊल पडते पुढे!..

प्रतिनिधी,नांदेड, किनवट,
-
- किनवटच्या पत्रकारितेच्या इतिहासात नवे पर्व…
महिला नेतृत्वाखाली घडतोय परिवर्तनाचा सुवर्णक्षण!
पत्रकारिता म्हणजे समाजाच्या वेदना शब्दात मांडण्याचे कार्य…
सत्यासाठी झगडण्याची हिंमत…
आणि अन्यायाविरुद्ध निर्भीड उभे राहण्याची ताकद…
आज किनवट तालुक्यातील पत्रकारितेला अभिमान वाटावा असा ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळत आहे.
पुरोगामी पत्रकार संघ, तालुका किनवट यांच्या नेतृत्वाची धुरा
तालुक्यातील एकमेव महिला पत्रकार
सन्माननीय परवीन शेख यांच्याकडे सोपवण्यात आली असून
ही निवड केवळ संघटनात्मक बदल नाही,
तर समता, प्रगती आणि पुरोगामी विचारांची ठाम घोषणा आहे.
दिनांक ४ फेब्रुवारी रोजी
किनवट येथील शासकीय विश्रामगृहात
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष
मा. विजयजी सूर्यवंशी साहेब
व राष्ट्रीय कार्याध्यक्ष अढांगळे साहेब यांच्या आदेशानुसार,
भूतपूर्व राज्य कार्याध्यक्ष शंकर सिंह ठाकूर,
राज्य संपर्कप्रमुख मारोती बा शिकारे
आणि नांदेड जिल्हाध्यक्ष दीपक मठपती यांच्या मार्गदर्शनाखाली
ही निवड प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
या बैठकीत पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र (तालुका किनवट) ची नवी कार्यकारिणी
सर्वानुमते जाहीर करण्यात आली.
🌟 नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
🔹 अध्यक्ष:
▪️ परवीन शेख
🔹 उपाध्यक्ष:
▪️ पवन खराटे
▪️ वशिम शेख
🔹 सचिव:
▪️ बी. व्ही. वावळे
🔹 सहसचिव:
▪️ वैभव पडवाळ
🔹 संघटक:
▪️ राहुल पाटील
▪️ ज्ञानेश्वर चाटे
🔹 तालुका कार्याध्यक्ष:
▪️ सुजाता भरणे
🔹 कोषाध्यक्ष:
▪️ संदीप गायकवाड
🔹 सहकोषाध्यक्ष:
▪️ मांगीलाल राठोड
🔹 सदस्य:
▪️ रामेश्वर दुडुळे
▪️ रविराज कानिंदे
▪️ कैलास राठोड
निवडीनंतर बोलताना अध्यक्ष परवीन शेख यांनी,
“तालुक्यातील प्रत्येक पत्रकाराच्या अडीअडचणी, समस्या आणि हक्कांसाठी संघटनेच्या माध्यमातून ठामपणे उभे राहू,”
असा विश्वासपूर्ण शब्द दिला.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा
शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
नव्या कार्यकारिणीमुळे
पत्रकार संघ अधिक बळकट, एकसंघ आणि प्रभावी होईल,
असा विश्वास सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.
आज किनवटच्या पत्रकारितेचा नवा अध्याय सुरू झाला आहे…
जिथे नेतृत्वात संवेदनशीलता आहे,
निर्णयात निर्भीडपणा आहे
आणि कार्यात प्रामाणिकपणा आहे.
💐 नूतन अध्यक्ष व संपूर्ण कार्यकारिणीस मनःपूर्वक शुभेच्छा!
आपले कार्य पत्रकारितेला नवे उंचीवर नेवो,
हीच सदिच्छा…!
✍️ शब्दांकन:
मारोती बा शिकारे
राज्य संपर्कप्रमुख तथा कोअर कमिटी सदस्य
📞 मोबाईल: 8975730818
- किनवटच्या पत्रकारितेच्या इतिहासात नवे पर्व…




