ठाण्यात पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे न्यू गर्ल्स स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न.

* *न्यू गर्ल्स स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न*.
.ठाणे (प्रतिनिधी) येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे न्यू गर्ल्स स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी ई सोसायटीचे आजीव सभासद व न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.भानुदास पाटील उपस्थित होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून संगीत क्षेत्रातील निर्माते श्री. रविंद्र देसाई उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात श्री.पाटील यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देत जीवनातील पुढील वाटचालीस यशस्वी होण्यासाठी कानमंत्र दिला.निरोप घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वतीने कु.सानिका झांजे, कु.संघमित्रा केसरकर, श्रीमती सोनाली तारीकर यांनी महाविद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यामुळे वातावरण भावुक झाले. कार्यक्रमात रविंद्र देसाई प्रस्तुत व त्यांच्या टिमच्या वतीने गीत गायन संगीताचा कार्यक्रम सादर करून विद्यार्थ्यांमध्ये रंगत आणली.तसेच अॅसेट कॉम्प्युटर ठाणे च्या वतीने विद्यार्थ्यांना लेखनिक पॅड भेट देण्यात आले.यावेळी न्यू गर्ल्स स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य किरणकुमार चव्हाण यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
समन्वयक श्री.प्रा. विश्वास भोईर व जेष्ठ शिक्षिका श्रीमती प्रा.मनस्वी नलावडे यांनी विद्यार्थ्यांना बोर्डांच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रा.अश्विनी भालेराव यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री.प्रा.सुरेश सावंत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. प्रा.सचिन कचरे, श्री.प्रा.विनोद वाघमारे, श्रीमती प्रा.वैशाली बडगुजर, श्रीमती प्रा. अंजली बोराडे व शिक्षकेतर कर्मचारी श्री.संतोष माने, श्री. सुभाष लाडके, श्री.अजित कोळसकर, श्रीमती कल्पना दाते यांनी परीश्रम घेतले.




