महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार अचानक विमान दुर्घटनेत दुर्देवी मृत्यू पावल्यानंतर.
भावाच्या मृतदेह बाजूला असून सुप्रियाताई सुळे नातेवाईकांना व येणाऱ्या सर्व पाहुण्यांना सावरताना रणरागिणीसारखी लढत होती.

“महाराष्ट्राचे दादा आनंदात विलीन”.
“महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर,!
“आपल्या भावाचा मृतदेह बाजूला असून न रडता रणरागिनी लढत होती.”
महाराष्ट्रावर काल पासून एक शोककळा पसरली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर महाराष्ट्रतील माणसांचे काळीज दुःखी आहे. सगळ्या माध्यमांवर यासंदर्भात चर्चा आणि चित्रण सुरू आहे. या सगळ्यांमध्ये मला एक गोष्ट खूप महत्त्वाची वाटली जेव्हा एखाद्या घरात अशी घटना घडते तेव्हा त्या घरातील दुःखाला आवर घालत, घरातील पुरुषाला कर्त्या पुरुषाच्या भूमिकेत जावं लागतं. अश्रूंना भावनाच्या कल्लोळाला आत कोंडून अशा क्षणी सुद्धा नियोजन प्रक्रियेचा भाग व्हावा लागत. घरातील महिलांच्या सांत्वनापासून ते अंत्यविधीच्या नियोजनापर्यंत पाहण्यात कर्त्या माणसाला स्वतःचे दुःख बाजूला ठेवावे लागते. काल पासून सुप्रिया सुळे यांचा असा वावर पाहत आहे. वडील, वहिनी, भाचे, कार्यकर्ते माध्यम शासकीय प्रक्रिया आणि स्वतःचे दुःख अशी सामाजिक चौकटीत कर्त्या पुरुषाची मानल्या गेलेली भूमिका बजावताना त्या दिसत आहेत. ‘घरातील करती स्त्री’.. अर्थात सगळ्या स्त्रिया इथपर्यंत पोहोचल्यात असं माझं म्हणणं नाही, असंख्य माणसांच्या लढ्यानंतर काही स्त्रिया कर्त्या स्त्रीच्या भूमिकेत आज उभ्या आहेत… दुःखाचा तळ गाठण अवघड, अशा वेळेस कर्त्याची भूमिका बजावणं तितकच जड आहे ते स्त्री असो पुरुष असो किंवा इतर…
“सुप्रिया सुळे ताईंनी आज जी भुमिका वाजवली ती फक्त एक स्त्री करु शकते “! “सलाम ताई आपल्या कार्याला”..



