हिरकणी परिवार फौंडेशन तर्फे माघी गणेशोत्सव साजरा.
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ व विचार विमर्श चे पदाधिकारी यांनी हिरकणी परिवार फौंडेशन यांच्या माघी गणेश उत्सवाला भेट दिली.

“हिरकणी तर्फे माघी गणेशोत्सवाचे आयोजन (पुरोगामी पत्रकार संघ व विचार विमर्श च्या पदाधिका-यांची भेट “.
प्रतिनिधी ठाणे – हिरकणी परिवार फाउंडेशन हि गेल्या सोळा वर्षापासून महिला सबलीकरणासाठी कार्यरत आहे. हिरकणी म्हणजेच महिलांच्ची महिलांनी महिलां करिता चालवलेली एक चळवळ आहे. हि चळवळ केवळ राज्यात व देशात न राहता सातासमुद्रापलिकडे जाऊन पोहचली आहे. ती केवळ आणि केवळ अथक परिश्रम व प्रामाणिकपणे केलेल्या सामाजिक कार्यामुळे. हिरकणी परिवार फाउंडेशन हि खऱ्या अर्थाने हक्काचं घर देणारी भारतातील एकमेव संघटना आहे.फाउंडेशनचे संस्थापक जयप्रकाश भांडे व अध्यक्षा विदया जयप्रकाश भांडे यांचा या चळवळीमध्ये फार मोठा वाटा आहे.
समाजात स्त्रीला मिळणारी वागणूक कुठेतरी बदलावी आणि तीला मानसन्मान, प्रतिष्ठा मिळून तीची प्रगती झाली पाहिजे तिला स्थैर्य प्राप्त झालं पाहिजे, महिला सबलीकरण हीच राष्ट्राची फार मोठी गरज आहे या विचाराने प्रेरीत होऊन जयप्रकाश भांडे व विदया भांडे यांनी हिरकणीच्या प्रवासाला सुरुवात केली.
आज मीतील असंख्य महिलांचा वटवृक्ष तयार होऊन त्या वटवृक्षाच्या छायेखाली ख-या अर्थाने महिलांचे सबलीकरणाचे कार्य जागतिक पातळीवर सुरु आहे. महिलांना स्वतःच मत व्यक्त करण्यासाठी असणारं व्यासपीठ आहे हिरकणी परिवार.




