राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची मराठवाडा आढावा बैठक संपन्न.
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची मराठवाडा आढावा बैठकीत मावळत्या पदाधिकाऱ्यांना निरोप तर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर.

*राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची मराठवाडा विभागीय बैठक संपन्न*
मावळत्या पदाधिकाऱ्यांना निरोप तर नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर!
नांदेड (दीपक मठपती) राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.विजयजी सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार दिनांक 14/12/2025 रोजी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची मराठवाडा विभागीय बैठक मा.शंकरसिह ठाकूर, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली व मारोती शिकारे, मराठवाडा अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत २०२५ च्या कार्यकारिणींचा निरोप समारंभ तसेच नूतन कार्यकारणीच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
यावेळी मारोती शिकारे यांनी जमलेल्या मराठवाडा भरातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ म्हणजे आधुनिक,वैज्ञानिक आणि सुधारणावादी दृष्टिकोन पुढे नेणारी विचारसरणी आहे. रूढीवादी विचारांना झुगारून समाजाच्या प्रगतीसाठी नवीन कल्पना,समानता आणि मानवी कल्याणाचा विचार करते असे मत मराठवाडा विभागीय अध्यक्ष मारोती शिकारे यांनी व्यक्त केले.
तर अध्यक्षीय समारोप करताना राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष मा.शंकरसिंह ठाकुर यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात पुरोगामी विचारसरणी समाजात रुजवण्याचे काम सर्व पत्रकारांनी करावे व मा.संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी सरांनी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे जे रोपटे लावले आहे त्याचे वटवृक्षात रुपांतर कसे झाले व त्या रोपट्याचे संगोपन करताना किती त्रास सहन करावा लागला हे विस्तृत केले
.
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ हे केवळ महाराष्ट्रा पुरता मर्यादित नसून तो अख्या भारत भर आहे हे आवर्जून सांगितले. शेवटी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना असे आवाहन केले की, तुम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार संघाच्या वाढीसाठी कसल्याही प्रकारे गालबोट न लागता संघाच्या ध्येय धोरणाशी बांधील राहून काम करा. तुम्ही संघाच्या हिताचे काम करत असताना व विनाकारण जर तुमच्या वर कोणी दबाव टाकत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवल्या शिवाय आम्ही राहणार नाही असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी मंचावर मराठवाडा महासचिव संजय राक्षसे, नांदेड जिल्हाध्यक्ष विनायक कामठेकर,
नांदेड जिल्हा उपाध्यक्ष सुरेशजी राठोड, नांदेड जिल्हा उपाध्यक्ष दीपक मठपती आदी उपस्थितीत होते.
यावेळी कार्यक्रमास लातूर जिल्हा महिला अन्याय अत्याचार समितीच्या अध्यक्ष्या सुमन राठोड, नांदेड जिल्हा महिला अन्याय अत्याचार समितीच्या अध्यक्षा सीमा गिरी, डॉ. जिरोणकर,डॉ.मुंडकर व मराठवाडा भरातील राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.




