महाराष्ट्र

“सशस्त्र सेना ध्वज दिवस ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे उत्साहात संपन्न.”

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाकडून दहा हजार रुपयांच्या धनादेश ठाणे जिल्हाधिकारी डॉ, श्रीकृष्ण पांचाळ यांना सुपूर्द केले.

प्रतिनिधी ठाणे.

*सशस्त्र सेना ध्वजदिन रोजी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारीकडे धनादेश सुपूर्द

ठाणे : सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन २०२५ हा कार्यक्रम नुकताच ९ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार ठाणे येथे पार पडला. याप्रसंगी निवासी जिल्हाधिकारी डॉ, संदीप माने,उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन श्रीमती रुपाली भालके, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवराच्या हस्ते विशेष उल्लेखनीय शासकीय व प्रशासकीय विभागात कार्य करणाऱ्या व्यक्तीना तसेच उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झालेल्या वेगवेगळ्या शैक्षणिक विभागात विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

fi

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ, ठाणे जिल्हा यांच्या वतीने भारतीय सैनिकांसाठी एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत दहा हजार रुपयांचा धनादेश आज ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना सन्मानपूर्वक सुपूरद करण्यात आला.

f

सैनिकांच्या कल्याणासाठी योगदान देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे भान ठेवून राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या ठाणे जिल्हा कार्यकारिणी जिल्हा अध्यक्ष, श्रावण पाटील, जिल्हा उपाध्यक्ष हिरादास सोनावले, जिल्हा सचिव विलास सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष रामदास वाढवणे, नरेंद्र पाटील, राजेंद्र मालवे, राजकुमार शर्मा, देवजी पटेल, इसरार समानी, डॉक्टर पल्लवी शिंगारे,शोभा लोणारे, ललिता गडकरी,इत्यादीनी १०००० रु.चा धनादेश जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केला. ध्वज दिनानिमित्त संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वेच्छेने रक्कम जमा करून हा निधी तयार केला. जिल्हाधिकाऱ्यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून संघाने दाखविलेल्या संवेदनशीलतेबद्दल आभार व्यक्त केले.

f

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या ठाणे जिल्हा कार्यकारिणी च्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत असून, समाजाच्या हितासाठी संघ सातत्याने कार्यरत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button