“विचार विमर्श” साप्ताहिक वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न..
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष, माननीय विजयजी सूर्यवंशी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबासाहेब आढांगडे, उद्योजक समाजसेवक माननीय महाराष्ट्र ट्रक टेम्पो असोसिएशन कार्याध्यक्ष, ठाणे जिल्हा वाहतूक सेवा संघ अध्यक्ष, वागळे स्टेट ट्रक टेम्पो असोसिएशन अध्यक्ष, माननीय विजयजी यादव, उद्योजक, समाजसेवक, जन स्वराज्य वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष माननीय राजन पाटील. जी,जी एज्युकेशन पॅरामेडिकल सायन्स चेअरमन माननीय गौतमजी गोसावी. यांच्या प्रमुख उपस्थितीत विचार विमर्श साप्ताहिक वृत्तपत्राचे प्रकाशन ठाणे येथे पार पडले.

“विचार विमर्श”साप्ताहिक वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा संपन्न .
ठाणे – ठाणे शहरातून प्रकाशित होणाऱ्या मराठी साप्ताहिक “विचार विमर्श” या साप्ताहिक वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा नुकताच ठाणे येथील जी.जी.एज्यूकेशन पॅरामेडिकलच्या सभागृहात नुकताच मोठ्या थाटात पार पडला.
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा,विजय सुर्यवंशी, उद्योजक, समाजसेवक, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र ट्रक टेम्पो लॉरी अध्यक्ष, ठाणे टेम्पो लॉरी सेवा, अध्यक्ष, वागळे टेम्पो लॉरी असोसिएशन मा,विजय यादव, उद्योजक, समाज सेवक, जन स्वराज्य वेल्फेअर ट्रस्ट मा, राजन पाटील जी.जी.पॅरामेडिकल सायन्स चे चेअरमन डॉ.गौतम गोसावी, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अढागळे, न्युज ०४ महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे मुख्य संपादक, तरुण गर्जना वृत्तसेवा संपादक, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष, मा,श्रावण पाटील, जेष्ठ पत्रकार विलास सावंत यांच्या शुभहस्ते या वृत्तपत्राचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी विजय सुर्यवंशी म्हणाले की, आजच्या काळात वृत्तपत्र चालविणे म्हणजे शिवधनुष्य उचलण्या सारखे आहे, पत्रकारीतेचा स्तर वाढवणे गरजेचे आहे. समाजाला चांगल्या पत्रकारांची गरज आहे.विचार विमर्श चे संपादक हिरादास सोनावले यांची पत्रकारितेतील प्रतिमा अतिशय सत्य व स्वच्छ आहे. असे गौरवोद्गार काढले. पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. आज पत्रकारां मुळेच आमच्या सारख्यांना समाजाच्या घडामोडी कळत असतात. विचार विमर्श च्या पुढील वाटचालीस माझ्या मनापासून शुभेच्छा देतो. असे विजय यादव म्हणाले,
इतर मान्यवर व्यक्तींनी ही विचार विमर्श च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, हिरादास सोनावले यांच्या पत्रकारिते बद्दल गौरवोद्गार काढले.
याप्रसंगी विचार विमर्श च्या प्रकाशन सोहळ्याचे औचित्य साधून हिरादास सोनावले यांनी शिव स्वामी फाउन्डेशन या त्यांच्या ट्रस्ट च्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.
यामध्ये शोभा लोणारे यांना आदर्श समाजसेविका, संध्या म्हसकर (आदर्श समाजसेविका), अँड.रचना भालके (आदर्श कायदेतज्ञ), रमेश राऊत (आदर्श पत्रकार), अंजली हडवले (आदर्श समाजसेविका), राजेंद्र मालवे (आदर्श मानवसेवा) , पल्लवी शिंगारे ( आदर्श आरोग्यसेवा), रामदास वाढवणे (आदर्श आध्यात्मिक सेवा), दिलीप सुराणा(आदर्श मानवसेवा), कु. भाविका तिवारी (आदर्श कलारत्न) , श्रावण पाटील (आदर्श पत्रकार), डाॅ.तेजस्विनी गोसावी (आदर्श आरोग्य सेवा), सदाशिव चव्हाण (आदर्श समाज रत्न) , वैशाली न्यायनिर्गुणे (आदर्श साहित्य सेवा), विलास सावंत (आदर्श उद्योगसेवा), रंजना तिवारी (आदर्श योग शिक्षीका), नानासाहेब खैरे (आदर्श मानवसेवा), छाया वाढवणे (आदर्श उद्योगसेवा), नरेंद्र पाटील (आदर्श समाजसेवक), शैला मराठे(आदर्श समाजसेविका), तनुजा बेलोटे(आदर्श कलासेवा), जयवंत मसणे( आदर्श समाजसेवक) राजेंद्र गोसावी (आदर्श मानवसेवा), चंद्रकांत वाघमारे (आदर्श पत्रकार), जगदीश सोनटक्के (आदर्श समाजसेवक), राजकुमार शर्मा (आदर्श मानवसेवा), भास्कर केदारे (आदर्श शिक्षक) ललिता गडकरी (आदर्श समाज सेविका) जीवन नाबर (समाज सेवक)या सन्माननीय व्यक्तींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवर व सन्माननीय व्यक्तींचे संस्थापक व संपादक हिरादास सोनावले यांनी आभार मानले व राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.



