महाराष्ट्र

भिवंडी एस, टी , डेपोची दयनीय अवस्था!

एस, टी, डेपो मॅनेजरला निवेदन देतांना राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे पदाधिकारी परिवहन मंत्री आहेत कोठे! भिवंडीकरांचा प्रश्न!

प्रतिनिधी, भिवंडी,

भिवंडी एसटी डेपोचे सुधारणा करून प्रवाशांना सोयी सुविधा कधी मिळणार! भिवंडीकरांच्या प्रश्न!

भिवंडी एसटी डेपो हा कित्येक वर्षापासून जुना डेपो आहे, सदर डेपो त्याच अवस्थेमध्ये आहे, या एसटी डेपो ची इतकी दुरवस्था झाली आहे की, त्याचे इमारत पडून कधी अपघात होईल व प्रवाशांच्या त्यामध्ये जीव जाईल हे सांगता येत नाही, एस ,टी,डेपोमध्ये संपूर्ण रस्ता खराब झालेला आहे डेपोमध्ये अनेक ठिकाणी खड्डे झाल्याने त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेला आहे ,तसेच भिवंडी एसटी डेपो मध्ये पाण्यामुळे तलावाच्या स्वरूप प्राप्त झाले आहे,

सदर डेपो मध्ये प्रवाशांना बसण्यासाठी सोय देखील व्यवस्थित नाही, शिवाय शौचलयाची अवस्था देखील दयनीय आहे, महिला प्रवाशांनी स्वच्छालय संबंधित प्रश्न कसे पूर्ण करावेत हा प्रश्न चिन्ह आहे, तसेच एसटी डेपो मध्ये एक दत्त मंदिर आहे, सदर दत्त मंदिर जवळ दुरवस्था झालेल्या शौचलयाचे पाणी येऊन साचते, तरी एसटी डेपोतील डेपो मॅनेजर यांना राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघातर्फे निवेदन देण्यात येत आहे,

तरी परिवहन मंत्री यांना राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघातर्फे व येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांकडून रस्ता शौचालय व बसण्याचे स्वच्छ व्यवस्था करून द्यावी अशी अपेक्षा प्रवासी व्यक्त करताना दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button