*श्रमजीवी संघटनेच्या धडक मोर्चा*, *श्रमजीवी संघटनेचे आत्मकलेशातून आत्मनिर्धार.*
श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माननीय विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी बांधव यांच्या ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा.

प्रतिनिधी, ठाणे, श्रावण पाटील. न्युज 04 महाराष्ट्र.
*कातकरींच्या अस्तित्वासाठी श्रमजीवीचे आत्मकथा आतनिर्धार आजपासून सुरू.*
सहा नोव्हेंबरला ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर वस्तीच्या तयारी धडकणार.
ठाण्यात आत्मनिर्धार सुरू असताना श्रमजीवीच्या प्रत्येक गावात उपवास करून सायंकाळी दारात लागणार आत्मकलेषातून निर्धाराचा दिवा.
ठाणे ०५ नोव्हेंबर २०२५ आज पासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या आदिवासी कातकरींच्या विदारक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, उत्तरदायित्वाची भावना म्हणून श्रमजीवी संघटनेचे, अध्यक्ष, रामभाऊ वारणा आणि संस्थापक, विवेक पंडित यांच्यासह राज्याचे पदाधिकारी आत्मकलेषातून आत्मनिर्धार मौन पाडून सुरुवात झाली आहे, उद्या देश स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या उंबरठ्यावर आहे, तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून केवळ काही किलोमीटर अंतरावर, राहणाऱ्या आदीम कातकऱ्यांच्या श्रमाच्या अमानुष बाजार आहे ,लहान मुलांचे बालपण खुडून नेलं जातय त्यांच्या माणूस म्हणून जगण्यात नाकारले जाते दारिद्र्य अन्याय आणि प्रशासनाच्या दीर्घकालीन अंमलबजावणीतील दिरंगाई मुळे हाआदीम समाज खुलेआम उध्वस्तेच्या मार्गावर उभा आहे, श्रमजीवी संघटनेने आदिवासी समाजातील आत्मकलेषातून आत्मनिर्धाराचे निर्णायक पाऊल उचलले आहे.




