राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ व महाराष्ट्र वाहतूक सेवा समितीची बैठक संपन्न.
"रणरागिणींच्या उगवता तारा" कर्तृत्ववान महिलांच्या सत्कार समारंभ ठाण्यात उत्साहात संपन्न.

- प्रतिनिधी ठाणे, श्रावण पाटील.
*पुरोगामी पत्रकार संघाच्या रणरागिनी सत्कार समारंभ उत्साहात संपन्न,*
ठाणे, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित महाराष्ट्र वाहतूक सेवा समितीतर्फे आयोजित, केलेल्या रणरागिनी कर्तुत्ववान महिला सन्मान समारंभ नुकताच ठाणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला,
समाजामध्ये असंख्य महिला अशा आहेत त्यांचे कार्य अतिशय उत्तम उल्लेखनीय आहे परंतु त्यांच्या कार्याची दखल कोणी घेत नाही, अथवा त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ही कोणी देत नाही, अशा रणरागिनी समाजाच्या उगवता तारा असणाऱ्या सन्माननीय महिलांना कर्तुत्ववान महिला सन्मानपत्र वही पेन व पुष्पगुच्छ देऊन उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे पत्रकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढांगळे ,अन्याय अत्याचार समितीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्रमिलाताई अडांगळे, जी जी एज्युकेशन ऑफ पॅरामेडिकल सायन्स चे चेअरमन डॉक्टर गौतम गोसावी, वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहिणी सोनार, जेष्ठ पत्रकार निरूपण कार प्रज्ञा पंडित, प्रसिद्ध रेडिओलॉजिस्टिक डॉक्टर तेजस्विनी गोसावी, अन्याय अत्याचार निवारण समितीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रीतम चव्हाण, व महाराष्ट्र वाहतूक सेवा समितीचे महाराष्ट्र सल्लागार राज पाटील मान्यवर उपस्थित होते,
यावेळी उपस्थित मान्यवरांनी रणरागिणींच्या कार्याबद्दल विचार प्रकट करून त्यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले, पत्रकार संघातर्फे अन्याय आत्ताच महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रमिलाताई आढांगळे, समाज सेविका ऋतुजा राज पाटील, नवीमुंबई जिल्हा अध्यक्ष आशा ढसाळ, रायगड जिल्हा अध्यक्ष,अश्विनी ठाकूर, प्रिया उपासनी , वाहतुक ठाणे जिल्हा अध्यक्ष,शोभा लोणारे, वैशाली न्याय निर्गुणे संध्या म्हस्कर , ठाणे जिल्हा संघटक,पल्लवी शिंगारे, प्रज्ञा पंडित, डॉक्टर तेजस्विनी गोसावी, रसिदा सय्यद , वाहतूक ठाणे उपाध्यक्ष,ललिता गडकरी संघाची सल्लागार,एडवोकेट रचना भालके, छाया वाढवणे, अनिता वर्मा, रेणू यादव, कांचन राणे इत्यादी सन्माननीय महिलांना गौरविण्यात आले,
कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष व वाहतूक समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्रावण पाटील, पत्रकार संघाच्या ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष, शोभा लोणारे, वाहतूक सेवा समितीचे ठाणे जिल्हा, अध्यक्ष रामदास वाढवणे व ठाणे जिल्हा संघटक, रवींद्र साळुंखे,यांनी केले होते, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष हिरादास सोनवणे यांनी केले, संघाचे कल्याण जिल्हा अध्यक्ष, नरेंद्र पाटील, कल्याण संघटक राजेंद्र मालवे, ठाणे उपाध्यक्ष रमेश राऊत, भिवंडी शहराध्यक्ष विशाल पाटील, पत्रकार संघाचे व महाराष्ट्र वाहतूक सेवा संघाचे सर्व पदाधिकारी व महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

