महाराष्ट्र

जॉय गिव्हर्स ग्रुप, श्री स्वामी समर्थ मठाकडून तारा जिल्हा परिषद शाळेला शालेय प्रयोगी वस्तू भेट.

शाळेच्या मुलांच्या गरजा लक्षात घेऊन, शाळेला ताट, ग्लास, पंखा चटया सतरंज्या सुपूर्द केल्या.

प्रतिनिधी,,

कैलासराजे घरत
खारपाडा पेण
‘जॉय गिव्हर्स ग्रुप’ व ‘श्री स्वामी समर्थ मठा’कडून
तारा जिल्हा परिषद शाळेला शालोपयोगी वस्तू भेट..!
“शाळेला पंखे, ताट, ग्लास आणि सतरंज्या सुपूर्द; मुलांच्या सुविधेसाठी अतिशय स्तुत्य उपक्रम”
पनवेल तालुक्यातील तारा येथील जिल्हा परिषद शाळेच्या गरजा लक्षात घेऊन ‘जॉय गिव्हर्स ग्रुप’ चेंबूर मुंबई तसेच ‘श्री स्वामी समर्थ मठ, आपटा फाटा’ यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेला विविध शालोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. हा स्तुत्य उपक्रम शुक्रवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी संपन्न झाला. शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा मिळाव्यात या हेतूने, शाळेला आवश्यक असलेले पंखे, विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी ताट व ग्लास, तसेच बसण्यासाठी सतरंज्या अशा वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वस्तू शाळेसाठी अत्यंत गरजेच्या होत्या.
याप्रसंगी ‘जॉय गिव्हर्स ग्रुप’ आणि ‘श्री स्वामी समर्थ मठा’तर्फे श्री. प्रदीप मोहिते, श्री. शंकर म्हात्रे, तसेच श्री. सुधाकर पाटील (केळवणे), समाजसेविका सौ. पुष्पलता पाटील हे मान्यवर उपस्थित होते. तसेच शाळेतर्फे श्रीमती. जयश्री मल्लिकार्जुन शिंदे, श्रीमती गोजरबाई बापूराव सरक उपस्थित होत्या. “शाळेतील मुलांना चांगली सेवा मिळावी व त्यांना उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हाच या दानामागील प्रामाणिक हेतू होता,” अशी भावना आयोजकांतर्फे यावेळी व्यक्त करण्यात आली.
या मदतीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार असून, या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांनी ‘जॉय गिव्हर्स ग्रुप’ व ‘श्री स्वामी समर्थ मठा’चे मनःपूर्वक आभार मानले.
असे उपक्रम राबवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले योगदान महत्वपूर्ण आहे. आपल्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!
असेच प्रेम, स्नेह जिव्हाळा आशीर्वाद आमच्या मुलांना लाभत राहो.अशी सदिच्छा सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार कैलासराजे घरत यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button