महाराष्ट्र

मुंबईच्या पवईत पोलीस थरार नाट्य.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांच्याकडून एनकाउंटर मध्ये आरोपी रोहित आर्याचा मृत्यू.

1

प्रतिनिधी ठाणे,
शुक्रवार दिनांक 29/ 10/ 25,
“मुंबईच्या पवईत ओलीस थरार नाट्य”
“माथे फिरू रोहित आर्य याच्या पोलीस एन्काऊंटर मध्ये मृत्यू”

मुंबईच्या पवईत १७ विद्यार्थी व २ नागरिक यांचा ओलीस थरार नाट्य,
आरोपी रोहित आर्य हा नागपूरच्या एका शाळेतील प्राध्यापक होता, स्वच्छता मोहीम अभियानाच्या तो प्रकल्प संचालक होता, शिक्षण विभागाने त्याचे दोन कोटी रुपये थकवल्याने राग मनात धरून त्याने मुंबईच्या पवईत आर स्टुडिओमध्ये ऑडिशनच्या नावाखाली चार ते पाच दिवसापासून मुलांना बोलवून ऑडिशन घेतली, त्याला सरकारला प्रश्न विचारायचे होते, कारण त्याने दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना घरासमोर उपोषण केले होते, त्याची मानसिक स्थिती योग्य न होती, ऑडिशनला येणारे पालक व विद्यार्थी यांना एका ऍडव्हर्टाईस च्या माध्यमातून आर स्टुडिओ येथे वेब सिरीज च्या नावाने ऑडिशन सुरू आहे अशी माहिती मिळाली, म्हणून पालक व विद्यार्थी तीन ते चार दिवसापासून सलग ऑडिशनला येत होते, परंतु आरोपी रोहित आर्य याच्या प्लान वेगळाच होता, चौथ्या दिवशी रोहित आर्याने ऑडिशनला येणारे पालक यांना १ वाजून 45 मिनिटांनी मेसेज केला, तुमच्या मुलांचे मी अपहरण केले आहे, मला सरकारचीकिंवा दीपक केसरकर यांची भेट घालून द्या, अशी रोहित आर्य याने पालकांकडे मागणी केली, त्याची सरकारकडे मागणी पैसे किंवा विद्यार्थ्यांना इजा पोहोचवण्याची नव्हती, याला सरकारला प्रश्न विचारायचे होते, कारण शिक्षण विभागाने रोहित आर्य याचे दोन करोड रुपये थकवल्याने राग मनात धरून त्याने हे कृत्य केले होते, माझी भेट सरकार बरोबर झाली नाही तर मी स्वतः आत्महत्या करेन किंवा स्टुडिओला आग लावेल व विद्यार्थ्यांचे बरे वाईट होईल असे त्याने आर स्टुडिओ मधून पालकांना धमकीच्या मेसेज केला, परंतु पवई पोलिसांच्या सतर्कतेमुळे व आर स्टुडिओ चे काचेचे काम चालू असल्याकारणाने त्या स्टुडिओला बांबू बांधले होते, त्याचा फायदा घेऊन पवई पोलीस क्राईम ब्रँच अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी मागच्या बाजूने बाथरूम तोडून आत शिरून आरोपी रोहित आर्य याला समजावण्याचा प्रयत्न केला, रोहित आर्य याच्याकडे एअरगन होती, रोहित आर्यने प्रतिकार म्हणून पवई पोलीस कर्मचारी यांच्यावर प्रति हल्ला केला, त्या प्रति हल्ल्यात पोलिसांनी आरोपी रोहित आर्य याच्यावर गोळीबार केला, या हल्ल्यात रोहित आर्य जखमी झाला त्याला ताबडतोब सेवन हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, डॉक्टरांनी आरोपी रोहित आर्य याला मृत घोषित केले, आरोपी रोहित आर्य याने विद्यार्थ्यांना व दोन नागरिकांना एका खोलीत दाबून ठेवले होते, त्यांना पवई पोलीस क्राईम ब्रँच पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले व पालकांच्या स्वाधीन केले, असा हा अपहरण थरार तीन तास पर्यंत चालू होता,
या घटनेत विद्यार्थी व नागरिक यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, यावेळी रोहित आर्य याला डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर त्याच्या मृतदेह ट्रॉमा हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला, पुढील तपास पवई पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक व क्राईम ब्रांच पोलीस अधिकारी करीत आहेत.∅

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button