जनता विद्यालय वायगाव (धुंधे) येथे माजी विद्यार्थी यांच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रम उत्साहात संपन्न.
बारा वर्षांनी माझी विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र, शिक्षक व मुख्याध्यापक यांनी उपस्थिती लावली.

प्रतिनिधी, दत्तू ठोके..
आज दिनांक 24-10-2025 रोजी जनता विद्यालय वायगाव दूंधे येथे माजी विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला तब्बल 12 वर्षांनी या शाळेचे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने एकत्र जमले, तसेच या कार्यक्रमात शिक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जनता विद्यालय वायगाव शाळेचे मुख्याध्यापक देसाई सर,डी के वाघ सर, पी यु पवार सर, एम. एन शेवाळे सर, आर जे जाधव सर, कापडणीस सर, जाधव मॅडम अनेक शिक्षक उपस्थित होते यावेळी प्रत्येक शिक्षकांचे शाल गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, सकाळी 9 ते 5 असा दिवसाभराच्या या गेट टू गेदर कार्यक्रमात अनेक कार्यक्रम उपक्रम घेण्यात आले, यावेळी सगळ्या शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले व प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच सकाळी 11 वाजता नास्ता दुपारी 2 वाजता जेवनाची सोय देखील करण्यात आली, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाचे काम तुषार देवरे यांनी केले. अशाप्रकारे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र जमून दिवसभर आनंद लुटला एकमेकांशी गप्पा गोष्टी करून चर्चा करून एकमेकांबद्दल माहिती घेतली.




