महाराष्ट्र

कल्याण फाट्यावरील दादागिरी करणाऱ्या वार्डन लोकांना अभय कोणाचे!

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ ठाणे घेणार परिवहन मंत्री यांची भेट!

प्रतिनिधी, ठाणे,

  • कल्याण फाटा शील रोड सर्कल हा नेहमीच वादग्रस्त विषय ठरला आहे कल्याण फाट्यावरील ट्रॅफिक तसेच येथील ट्रॅफिक हवालदार आणि त्यापेक्षाही जास्त येतील वॉर्डन लोकांची दादागिरी याबाबत येथील दक्ष नागरिक संघटना तसेच वेगवेगळ्या सामाजिक संस्था, समाजसेवक यांनी नेहमी ट्रॅफिक विभागाचे अधिकारी तसेच राजकीय लोकांना येथे कशाप्रकारे गैरव्यवहार आणि रात्रीच्या वेळेस तर पूर्णपणे दादागिरी चालते येथील वॉर्डन रात्री दहाच्या नंतर पनवेल कडून येणाऱ्या अवजड वाहनांना सर्कलवर थांबून जबरदस्तीने स्वतः दरवाजा उघडून ड्रायव्हरच्या केबिनमध्ये चढून ड्रायवरांना धमकावून त्यांच्याकडून पैशांची मागणी करीत असतात.
    काही दिवसापूर्वी येथील दक्ष नागरिक संघटनेने ट्राफिक विभागाचे डीसीपी श्री.पंकज शिरसाट यांची भेट घेऊन त्यांना पुराव्या सकट कल्याण फाटा सर्कल आणि मुंब्रा बायपास येथील बंद टोलनाक्याजवळ हे वॉर्डन कशाप्रकारे कुठलाही अधिकारी सोबत नसताना ट्रक वाल्यांची लूटमार करतात हे पुराव्या सकट दाखवून दिले होते तरीही ही लूटमार आणि दादागिरी अजून थांबवली जात नाही म्हणजेच डीसीपी पंकज शिरसाट साहेब स्वतः या होणाऱ्या लुटमारीसाठी जबाबदार आहेत असे समजावे का?असा प्रश्न येथील नागरिक तसेच प्रवाशांना पडला आहे ही लुटमार अशी चालत राहिली तर एक मोठे जन आंदोलन उभे करून येथील वॉर्डन आणि अधिकारी यांना धडा शिकवावा लागेल अशी चर्चा सर्वसामान्य जनतेत होत आहे जर हा प्रकार थांबला नाही तर लवकरच परिवहन मंत्री माननीय श्री. प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन हा सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा निर्धार राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे ठाणे उप शहर प्रमुख तसेच दैनिक युवक आधार चे पत्रकार रमेश राऊत यांनी केला आहे.
    कारवाई करण्यास कोणाचाही विरोध नाही पण ती कारवाई कायद्याच्या चौकटीत राहून आणि नियमाचे पालन करून करावी हीच मागणी माननीय परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांच्याकडे पुरोगामी पत्रकार संघाचे वतीने करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button