प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे,
शेतकरी संघटना व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ यांच्या कार्यकर्त्यांशी केलेली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मा,रोहित काटकर यांनी केलेली सकारात्मक चर्चा.

ठाणे प्रादेशिक कार्यालय ठाणे ,
उपप्रादेशिक अधिकारी यांच्याशी झालेली सकारात्मक चर्चा, शेतकरी संघटना व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संचलित, महाराष्ट्र वाहतूक सेवा समिती चे कार्यकर्ते यांच्या वतीने महाराष्ट्रातील वाहतूकदारांवर परिवहन विभागाकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या अन्यायकारक जाचक कारवाई विरोधात तीव्र निषेध नोंदवण्यासाठी हे निवेदन दिले होते, परंतु परिवहन विभागाकडून क्षमतेपेक्षा थोडा जास्त माल भरलेला वाहनांवरही आवाजवी मोठे दंड आकारले जाते होते,ज्यामुळे वाहतूक दार व्यवसायाचे मोठे आर्थिक नुकसान होत होते ,कारवाई करताना अनेक ठिकाणी वाहतूकदारांना आणि वाहन चालकांना अमानवी वागणूक दिली जात होती यासंदर्भात शेतकरी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष, व महाराष्ट्र वाहतूक सेवा समितीचे महाराष्ट्र सल्लागार, शिवश्री, राज पाटील, व महाराष्ट्र वाहतूक सेवा समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री, श्रावण पाटील , रविन्द्र साळुंखे, शोभा लोणारे प्रवीण माळी, विलास सावंत, दर्पण पाटील व पदाधिकारी यांनी आज ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग येथे जाऊन उपप्रादेशिक अधिकारी मा, रोहित काटकर साहेब यांच्याशी सकारात्मक चर्चा केली, व शेतकरी संघटना व महाराष्ट्र वाहतूक सेवा समिती चे पदाधिकारी यांच्या प्रश्नांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मा, रोहित काटकर यांनी सकारात्मक उत्तर दिले.




