महाराष्ट्र

निःस्वार्थ कार्याचा आदर्श… नरेन्द्र सोनार..

पत्रकार, कवी, साहित्यिक आणि संघटक अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचा प्रवास.

1

*निःस्वार्थी✍🏻 कार्याचा आदर्श — नरेंद्र सोनारकर!*

पत्रकार, कवी, साहित्यिक आणि संघटक अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा प्रवास

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य संघटक तसेच पुरोगामी साहित्य संसद समितीचे राज्य अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले
*नरेंद्र सोनारकर* हे नाव आज संघटनेत निष्ठा, प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ भावनेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.

पत्रकारितेबरोबरच साहित्यिक क्षेत्रातही त्यांनी मोठं योगदान दिलं आहे. कवी संमेलन, साहित्य संमेलने आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून त्यांनी अनेक नवोदित कवींना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्यांच्या पुढाकाराने संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रेरणादायी कार्यक्रम राबवण्यात आले.

बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य ते आपल्या पत्नी आणि कुटुंबासह सातत्याने करीत आहेत.
त्यांचा स्वभाव साधा, मन पारदर्शक आणि बोलण्यात स्पष्टपणा — जे मनात ते थेट बोलणारे, कुठलाही दिखावा न करणारे व्यक्तिमत्त्व.

*संघटनेत त्यांनी केलेल्या असंख्य कामांचे श्रेय कधी स्वतः घेतले नाही. उलट जेव्हा त्यांना महाराष्ट्र राज्य सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली, तेव्हा त्यांनी ती जबाबदारी स्वीकारण्याऐवजी ती निलेश ठाकरे यांना सोपवली. हा त्यांचा निस्वार्थी स्वभाव आणि संघभावनेचा उत्तम नमुना आहे.*

कधी काही गैरसमजांमुळे त्यांना डावलण्याचा प्रयत्न झाला तरी, त्यांनी संयम राखला आणि संघटनेच्या वाढीसाठीच काम सुरू ठेवले.
“मी संघटनेसाठी हे केलं” असं कधी न सांगता, शांतपणे, सातत्याने काम करणं — हीच त्यांची कार्यशैली आहे.

आगामी काळात संघटनेला अधिक उंचीवर नेण्याचा त्यांनी 2026 साली ठाम संकल्प केला आहे.
“संघाला महाराष्ट्रात सर्वोच्च स्थानावर नेणं, हीच माझी खरी सेवा,” असं त्यांनी अलीकडच्या चर्चेत सांगितलं.

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ अशा निःस्वार्थ, विचारशील आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचा अभिमान बाळगतो.

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य संघटक तथा पुरोगामी साहित्य संसद समितीचे *अध्यक्ष श्री. नरेंद्र सोनारकर —* संघटनेचे प्रेरणास्थान.

: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ परिवार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button