ठाण्यात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची बैठक नियुक्ती पत्र वाटप सोहळा संपन्न.
थोर स्वातंत्र्य सेनानी पांडुरंग गोसावी गुरुजी यांच्या स्मृति ग्रंथ वाटप सोहळा संपन्न.

*स्वातंत्र्यसेनानी* *पांडुरंग गोसावी स्मृतीग्रंथ वाटप व पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न*
*
ठाणे दि. २१ सप्टेंबर : थोर स्वातंत्र्यसेनानी पांडुरंग गोसावी गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्मृतीग्रंथ वाटप व पुरस्कार वितरण सोहळा जी.जी. एज्युकेशन फाउंडेशन, वज्रालय, ठाणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान *राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. विजयजी सूर्यवंशी यांनी भूषविले. तर राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबासाहेब आढांगळे प्रमुख उपस्थिति लाभली.*
या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष सन्मान व पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. त्यामध्ये :
**प्रमिला अढांगळे* – *कार्याध्यक्ष*
*
*शिवश्री राज पाटील – अध्यक्ष, कोकण विभागीय मध्यम शेतकरी संघटना*
*शिवश्री चंद्रशेखर पवार – जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, ठाणे*
**झुंबरसिंग पाटील – राष्ट्रीय संपर्क प्रमुख, पुरोगामी पत्रकार संघ*
*
*प्रितमसिंग चौहान – राज्य सचिव, अन्याय अत्याचार निवारण समिती*
*डॉ. शितिज कुलकर्णी – लेखक, नाटककार व दिग्दर्शक*
*प्रसन्न माळी – अभिनेता, नृत्यकलाकार व काव्यवाचक*
*अजय भोसले – सामाजिक कार्यकर्ते*
*श्रावण पाटील – जिल्हाध्यक्ष, पुरोगामी पत्रकार संघ, ठाणे*
*राजेंद्र गोसावी – ज्येष्ठ पत्रकार*
*प्रमोद पाटील – कार्याध्यक्ष, पनवेल तालुका*
*हिरादास सोनावले – ठाणे जिल्हा उपाध्यक्ष*
*यांना पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.*
समारंभाच्या प्रारंभी पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. डॉ. जी.एस. सावंत (चीफ मॅनेजर, भारतीय रेल्वे) यांनी स्वातंत्र्यसेनानी पांडुरंग गोसावी गुरुजींच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली.
राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबासाहेब आढांगळे यांनी मार्गदर्शन करताना पत्रकारांनी निर्भीडपणे व निडरपणे समाजासमोर सत्य मांडण्याचे महत्व अधोरेखित केले. शिवश्री राज पाटील यांनी पत्रकारांवर होणाऱ्या दबावांचा उल्लेख करून, पत्रकारांनी सध्याच्या परिस्थितीत अधिक सजग राहावे असे मत व्यक्त केले.
यावेळी डॉ. गौतम गोसावी (संस्थापक अध्यक्ष, जी.जी. एज्युकेशन फाउंडेशन व उपाध्यक्ष, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ, ठाणे) यांनी आपल्या भाषणात गेल्या अनेक वर्षांपासून तरुणांना रोजगार व शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. दरवर्षी ५०० हून अधिक तरुणांना पॅरामेडिकल, मेडिकल व पॅथॉलॉजी क्षेत्रात प्रशिक्षण देऊन स्वावलंबी करण्याचे कार्य त्यांनी यशस्वीपणे केले आहे. त्यांच्या या सामाजिक योगदानाचे संस्थापक अध्यक्ष मा. विजयजी सूर्यवंशी साहेब यांनी विशेष कौतुक केले.
तसेच, डॉ. तेजस्विनी गौतम गोसावी यांचेही कार्य कौतुकास्पद मानले गेले. त्या डॉ. गौतम गोसावी यांच्यासह समाजातील तरुणांना मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. दाम्पत्याच्या या कार्यामुळे समाजात एक आदर्श निर्माण झाला असल्याचे मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरादास सोनावले (ठाणे जिल्हा उपाध्यक्ष) यांनी उत्तमरीत्या केले.
या वेळी रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये रायगड जिल्हाध्यक्ष धनाजी पुदाले, सचिव राजपाल शोगोकार, खालापूर तालुकाध्यक्ष बालाराम सावंत, पनवेल तालुका कार्याध्यक्ष प्रमोद पाटील यांचा विशेष उल्लेखनीय सहभाग होता.
कार्यक्रमास राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे अनेक पदाधिकारी, पत्रकार व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




