महाराष्ट्र

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मा, अँड, मनोज दादा आखरे यांच्या वाढ दिवसानिमित्त कार्यकर्ता सन्मानदिन उत्साहात साजरा.

ठाणे जिल्हा संभाजी ब्रिगेडचे शिवश्री, चंद्रशेखर पवार यांनी बल्लाळ सभागृहात पदाधिकारी व पत्रकार यांना मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

प्रतिनिधी, ठाणे, श्रावण पाटील,

बुधवार,दिनांक:०३/०९/२०२५.

*ठाणे महापालिकेच्या बल्लाळ सभागृहात संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष अँड, मा, मनोजदादा आखरे यांच्या वाढ दिवसानिमित्त कार्यकर्ता सन्मानदिन उत्साहात साजरा.*
संभाजी ब्रिगेड ठाणे जिल्हा अध्यक्ष मा, शिवश्री, चंद्रशेखर पवार यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगर पालिकेच्या बल्लाळ सभागृहात संभाजी ब्रिगेडचे महिला, पुरूष पदाधिकारी व जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी, मराठा संघटनेचे पदाधिकारी व ठाणे जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधु व महिला पत्रकार यांना मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले, या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे व पत्रकार बंधु यांनी आपले मत व्यक्त केले, या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेड, जिजाऊ संघटना, मराठा संघटना यांनी आवर्जुन उपस्थिती लावली. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर ठाणे जिल्हा संभाजी ब्रिगेड यांनी मान्यवरांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button