पत्रकारांचा न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ.
"आमचे ध्येय म्हणजे समस्या सोडवणे नाही, जबाबदारी!

*पुरोगामी पत्रकार संघाचा पत्रकार बांधवांच्या* *हक्कांसाठी ठाम निर्धार* *
*पत्रकारांचे हक्क, सुरक्षा आणि न्यायासाठी संघटनेचा लढा*
ठाणे (प्रतिनिधी) :
पुरोगामी पत्रकार संघ ही संघटना केवळ संघटना निर्माण करण्यापुरती नसून पत्रकारिता क्षेत्रातील स्वातंत्र्य, सचोटी आणि सामाजिक जबाबदारी जपण्यासाठी स्थापन झाल्याचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र शिंदे यांनी सांगितले.
पत्रकारिता ही केवळ वृत्तांकनापुरती मर्यादित नसून ती समाजाला दिशा देणारी, विचारांची सुरुवात करणारी आणि लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे त्यांनी नमूद केले.
पत्रकार बांधवांवर अनेकदा अन्याय, शोषण व दडपशाहीचे सावट येते. अशा वेळी त्यांना सक्षम करणे, मार्गदर्शन, सुरक्षा आणि न्याय देणे ही संघटनेची जबाबदारी असल्याचे डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले.
संघटना केवळ पत्रकारांच्या कल्याणापुरती मर्यादित नसून शिक्षण, आरोग्य, संस्कृती व पर्यावरणीय उपक्रमांद्वारे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. वृक्षारोपण मोहिमा, आरोग्य शिबिरे, जनजागृती उपक्रम आणि विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तींचा सन्मान हे उपक्रम संघटनेच्या माध्यमातून राबवले जातात.
शेवटी, “आमचे ध्येय केवळ समस्या सोडवणे नाही, तर जबाबदार पत्रकारितेचा वारसा पुढील पिढीकडे सुपूर्त करून सकारात्मक सामाजिक बदल घडवणे आहे. या ध्येयासाठी प्रत्येक पत्रकार बांधवांनी एकदिलाने संघटनेसोबत उभे राहावे,” असे आवाहन अध्यक्ष डॉ. सुरेंद्र शिंदे यांनी केले.




