महाराष्ट्र

ठाण्यात भारतीय जनता पक्षाचे वनमंत्री श्री, गणेश नाईक यांचा जनता दरबार.

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचा जनता दरबार.

प्रतिनिधी, ठाणे, श्रावण पाटील, न्युज 04 महाराष्ट्र,

दिनांक २२/०८/२०२५, शुक्रवार,
<span;>ठाण्यात गडकरी रंगायतन येथे, भारतीय जनता पक्षाचे, वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री, गणेश नाईक यांनी ठाण्यात, तिसऱ्यांदा जनता दरबार बोलावला, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात, भारतीय जनता पक्षाचा शिरकाव, मंत्री श्री, गणेश नाईक यांच्या माध्यमातून होतांना दिसत आहे, काही कालावधीतच महानगर पालिकेच्या निवडणुका लागणार आहेत, त्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाची, ठाण्यात शिवसेनेला शह देण्याची तयारी सुरू झाली आहे, आणि ती मंत्री गणेश नाईक, यांनी ठाण्यात सुरवात केली आहे, असे ठाण्यात दबक्या आवाजात बोलले जात आहे, मंत्री श्री, गणेश नाईक यांचा ठाण्यात ,हा तिसरा जनता दरबार असून, नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे, कारण मंत्री महोदय हे नागरिकांच्या समस्या विषयी जाणुन घेऊन, ताबडतोब संबंधित अधिकारी यांना सूचना देऊन ,तत्काळ नागरीकांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहेत, म्हणुन नागरिकाचा ठाण्यात वाढता प्रतिसाद, भारतीय जनता पक्षाला मिळत आहे, माध्यमांशी बोलतांना, मंत्री श्री, गणेश नाईक यांनी सांगितले ,की भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्र , मुंबई ,ठाण्यात भाजपचाच महापौर बसेल ,असे त्यांनी ठणकावून सांगितले, या प्रसंगी माझी खासदार श्री, संजीव नाईक, विधान परिषदेचे आमदार श्री, निरंजन डावखरे, भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष, श्री, संदीप लेले, श्री, संजय वाघुले, श्री, राजेश मडवी, ठाण्याचे उपायुक्त मनीष जोशी, ठाण्यातील भारतीय जनता पक्षाचे ,महिला पुरुष कार्यकर्ते व पदाधिकारी, व प्रशासकीय कर्मचारी व अधिकारी यांनी उपस्थिती लावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button