दहीहंडी उत्सव २०२५ उत्साहात साजरा..
जोगेश्वरी कोकण गोविंदा पथकाने व जय जवान गोविंदा पथकाने दहा मानवी मनोरे लाऊन विश्व विक्रम केला.

प्रतिनिधी, ठाणे, श्रावण पाटील,
“दहीहंडी उत्सव २०२५”
काल सकाळी नऊ वाजेपासून सुमारे रात्री ११ वाजेपर्यंत दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे येथे दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला, या मेट्रो सिटींमध्ये बक्षिसांची रक्कम ही लाखात होती, म्हणुन दहीहंडी उत्सवात पुणे, नाशिक, औरंगाबाद येथील गोविंदा यांनी मुंबई, ठाणे येथे येऊन मानवी मनोरे रचून इतिहास रचला, आपल्या या दहीहंडीच्या उत्सवात आनंद लुटला, या उत्सवात हिंदी व मराठी फिल्मी सिटीचे प्रसिद्ध कलाकार व राजकीय नेते मंडळी यांनी उपस्थिती लावून दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला, येणाऱ्या गोविंदांचा उत्साह वाढावा म्हणून गीत गायन व नृत्य सादरीकरण करण्यात आले, या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री, देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई व ठाण्यात दहीहंडी मंडळांना भेट देऊन गोविंदांचा उत्साह वाढवला, त्याच प्रमाणे उपमुख्यमंत्री मा, एकनाथ शिंदे यांनी ही मुंबई व ठाण्यातील दहीहंडी मंडळांना भेट देऊन शुभेच्छा दिल्या व गोविंदांचा उत्साह वाढवला, या दहीहंडी उत्सवात भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी, शिवसेनेचे नेते मंडळी, मनसेचे नेते मंडळी, उबाठाचे नेते मंडळी यांनी मोठ्या संख्येने दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला व गोविंदांचा उत्साह वाढवला, गोकुळाष्टमी सणाच्या या पावन दिवशी दहीहंडीचा उत्सव साजरा करत असतांना मात्र मुंबई येथे दोन गोविंदा एक ३२ वर्षे व दुसरा १४ वर्षे यांचा मृत्यू झाला, ७५ ते ८० गोविंदा हे जखमी झाले असे समजते, या दहीहंडी उत्सवात जोगेश्वरी येथील कोकण नगर गोविंदा पथकाने २०२५ ठाण्यात १० थरांचा मानवी मनोरा रचुन इतिहास रचला त्याच प्रमाणे जय जवान गोविंदा पथक मंडळाने ही १० थरांचा मानवी मनोरा रचुन इतिहास घडवला,,,,,




