महाराष्ट्र

जाणीव वृद्धाश्रमात कल्याण येथे कु, सर्वेश जावडे याचा वाढ दिवस उत्साहात साजरा.

समाज सेवक खान्देश सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष मा, नितीन जावळे यांच्या सुपुत्र कु, सर्वेश जावडे याचा वाढ दिवस साजरा.

  1. *”जाणीव वृद्धाश्रमात कु.सर्वेश जावळे यांचा वाढदिवस साजरा,उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू”…*
    प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, खान्देश सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री.नितीन जावळे हे “मानव सेवा हिच खरी ईश्वर सेवा” हे ब्रीद वाक्य मानून आपल्या एकुलत्या एक चिरंजीव कु. सर्वेश चा वाढदिवस दरवर्षी विविध अनाथ आश्रम,मतिमंद आश्रम,अंध शाळा, सिव्हिल हॉस्पिटल येथे साजरा करतात, यंदाही त्यांच्या मुलाचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आपल्या सेवाभावी कार्याने नावाजलेल्या जाणीव वृद्धाश्रम, आंभे गाव, नेवाळी,मलंग रोड, कल्याण येथे साजरा करण्यात आला त्या वेळी वृद्धाश्रमातील सर्व उपस्थित वयोवृद्ध नागरिकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होतें,वाढदिवस साजरा होत असताना उपस्थित मान्यवरांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना एका वयोवृद्ध आजीने डोळे पुसतांना सांगितले की… आमच्या स्वतःच्या मुला मुलींनी प्रॉपर्टी ताब्यात घेऊन आमच्या आजारपणाला कंटाळून आम्हाला घरा बाहेर काढले असता आम्ही उदर निर्वाह करण्यासाठी रेल्वे स्टेशन,बस स्टॅन्ड, किंवा खेडे गावाच्या बाहेर कसे तरी उपेक्षित आणि हलाखीचे जीवन जगत होतो, परंतु आम्हाला जाणीव आश्रम चे संस्थापक सन्मा. श्री. मनोज पांचाळ, सौं. सोनाली ताई पांचाळ यांनी आम्हाला शोधून काढून मायेचा मोठा आधार दिला, आजच्या काळात रक्ताचे नाते असलेल्या मुला मुलींनी आम्हाला तुच्छ वागणूक दिली परंतु एखाद्या देवदूता सारखे मनोज पांचाळ आमच्या साठी धावून आले, मानवता आणि सदभावना असलेली परकी मंडळी सदर ठिकाणी आवर्जून येतात आणि आमच्या सोबत वाढदिवस वगैरे कार्यक्रम साजरा करून स्नेहभोजन करतात ह्या मध्ये आम्हाला मोठा आनंद मिळतो,(आम्हाला काय हवे असते फक्त दोन घास प्रेमाचे हवे असतात), सदर प्रसंगी जाणीव आश्रम चे सन्मा. श्री. मनोज पांचाळ,सन्मा. सौं. सोनाली पांचाळ, व्यवस्थापक सन्मा. श्री.सुहास नेर्लेकर, लेवा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते राजु पाटील,आदिवासी बहुल भागात सामाजिक कार्य केलेल्या सौं. कामिनी जावळे,लोकमत सखी मंच च्या सौं. स्मिता चौधरी आणि इतर सन्माननीय मान्यवर उपस्थित होतें.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button