
प्रतिनिधी मुंबई..
श्रावण पाटील..न्युज 04 महाराष्ट्र..
**२००६ मुंबई ट्रेन बॉम्ब ब्लास्ट**..
***उच्च न्यायालयाचा धक्कादायक निर्णय***.
मुंबईला हादरवून टाकणाऱ्या ११ जुलै २००६ च्या साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची आज मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे, दोशीं पैकी पाच जणांना फाशीची शिक्षेची तर सात जणांना जन्म ठेपेची शिक्षा सुनावली होती,
या पाच जणांनी फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, उच्च न्यायालयाने त्यांच्या अपील मान्य केला, फाशीची शिक्षा रद्द करू नये अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली होती, पण न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्य सरकारला दणका बसला,
बारा दोशींपैकी एकाच्या आधीच मृत्यू झाला आहे, तर ११ जणांच्या आता कोर्टा बाहेर येण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे, १९ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दोशींची निर्दोष मुक्तता झाली आहे, १९ वर्षे प्रदीर्घ कालावधीनंतर दोषींची निर्दोष मुक्तता झाली,गेली १९ वर्षे यातील दोषी एकही दिवस तुरुंगाबाहेर आले नव्हते,
मुंबई ११ जुलै २००६ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास लोकलमध्ये एकूण सात ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट झाले होते, माटुंगा, माहीम, बांद्रा, जोगेश्वरी, बोरीवली, कांदिवली, मिरा रोड, या रेल्वे स्थानकात दरम्यान झाले होते, यात 209 हुन अधिक जणांच्या मृत्यू झाला होता.




