पत्रकारांना टोल माफी मिळावी यासाठी निवेदन सादर.
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष मा, प्रकाश जाधव..

पत्रकारांना टोल माफी मिळावी यासाठी निवेदन सादर
प्रतिनिधी रत्नागिरी,
दि. १७/७/२०२५
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांना महामार्गावरील टोल माफ करण्यात यावा, यासाठी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.
हे निवेदन संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष श्री. प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. पत्रकार आपल्या कर्तव्यादरम्यान वारंवार प्रवास करीत असतात. अशा स्थितीत त्यांना टोलमुक्त सुविधा मिळावी, ही संघाची प्रमुख मागणी होती.
श्री. जाधव यांनी यावेळी सांगितले की, “पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत. त्यांच्या दैनंदिन कामकाजात अनेक वेळा टोलमार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे टोल माफी ही त्यांच्या कामाच्या अनुषंगाने आवश्यक आहे.”
यावेळी संघाचे अन्य पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाची नोंद घेतली असून पुढील कार्यवाहीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
याप्रमाणे निवेदन प्रत्येक जिल्हाध्यक्ष आणि द्यावे




