Uncategorized

शासनाचा महसूल बुडवून स्वतः तहसील दार संशयित.

विकास नावाखाली अवैध उत्खनन.

प्रेस नोट,

शासनाचा महसूल बुडवून स्वतः कमाई
करणाऱ्यात तहसीलदार संशयित

यवतमाळ (प्रतिनिधी)
प्रतिनिधी अरुण देशमुख
विकास कामाच्या नावाखाली अवैधपणे उत्खनन केल्या जात आहे, नैसर्गिक संपत्ती नष्ट केल्या जात आहे, तसेच करोडो रुपयाचा शासनाचा महसूल बुडवून लाखो रुपयांची कमाई संबंधित शासकीय कर्मचारी व कंत्राटदार करीत असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी सौ.दीपा झोंबाडे हिने रीतसर तक्रार जिल्हाधिकारी यवतमाळ यांना दिलेली आहे.
सविस्तर वृत्त असे की, मौजे तिवसा व मौजे बोरजई ता. यवतमाळ या परिसरात रेल्वे प्रकल्पाच्या विकासाचे काम चालू असून त्या विकास कामाच्या नावाखाली कंत्राटदार उपक्रम यांनी अवैधपणे उत्खनन केलेले असून त्यासंदर्भात चौकशी व कारवाई करण्याची मागणी तक्रारदार सौदी पाडे यांनी वारंवार जिल्हा खणेकर व अधिकारी यवतमाळ तसेच तहसीलदार यवतमाळ यांना केलेले असून त्यावर मोठ्या आर्थिक व्यवहारापोटी या प्रकरणावर चौकशी होत नसल्याने यातील तक्रारदार हिने जाय मोक्यावर पत्रकार परिषद घेऊन “आत्मदहन “आंदोलन करण्याचा इशारा तक्रारीद्वारे जिल्हाधिकारी,यवतमाळ यांना दिलेला आहे.
विश्वासनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार विद्यमान तहसीलदार योगेश देशमुख यांच्या अधिकार क्षेत्रातील मौजे तिवसा व मौजे बोरजई परिसरात रेल्वे विकास निगम लिमिटेड अंतर्गत आय.एस.सी.कंपनीने रेल्वे विकासाचे कंत्राट घेतलेले असून श्रावणी कन्स्ट्रक्शन या उपकंत्राटदारा मार्फत या परिसरात विकासाच्या नावाखाली अवैध उत्खनन चालू असून परवानगी,रॉयल्टी, व अनेक अनियमितता प्रत्यक्षात होत आहे. या परिसरातून रेल्वे कंत्राटदार व उपकंत्राट दाराकडून संबंधित सर्व विभागातील कर्मचारी /अधिकाऱ्यांना मोठे “आर्थिक व्यवहार “होत असून त्यामुळेच खुलेआम अवैध उत्खनन चालू असल्याची चर्चा परिसरात चांगलीच गाजत आहे. आणि त्यामुळेच यासंदर्भात विद्यमान मुख्य न्यायाधीश,उच्च न्यायालय, खंडपीठ, नागपूर यांचेकडे प्रकरणाबाबत दाद मागितली असून संबंधित कर्मचाऱ्यांवर अनेक विभागांकडून चौकशीची मागणी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button