महाराष्ट्र

उरण विधानसभा जनसंपर्क कार्यालयाचे खा. श्रीरंग बारणे यांच्या हस्ते उद्घाटन

​उरण विधानसभा जनसंपर्क कार्यालयाचे खा. श्रीरंग बारणे यांच्या हस्ते उद्घाटनण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि पक्षाची ताकद वाढवण्यासाठी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते रविवारी, १ मार्च २०२६ रोजी भव्य जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

​ठळक बातमी: उरण विधानसभा जनसंपर्क कार्यालयाचे खा. श्रीरंग बारणे यांच्या हस्ते उद्घाटन
​उरउरण विधानसभा जनसंपर्क कार्यालयाचे खा. श्रीरंग बारणे यांच्या हस्ते उद्घाटनण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि पक्षाची ताकद वाढवण्यासाठी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते रविवारी, १ मार्च २०२६ रोजी भव्य जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
​प्रमुख मुद्दे:
​उद्घाटन सोहळा: उरण कामठा रोडवरील श्रीराजनगर कॉम्प्लेक्स येथे सायंकाळी ५ वाजता हा सोहळा पार पडला.
​जनतेशी बांधीलकी: “जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव कार्यरत राहू,” असे आश्वासन खासदार बारणे यांनी दिले.
​शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश: या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे विविध राजकीय पक्षांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खासदारांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
​पक्ष वाढीचा मंत्र: स्वार्थ आणि हेवेदावे बाजूला ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन बारणे यांनी केले.
​उपस्थित मान्यवर: यावेळी रामदास शेवाळे, विनोदभाऊ साबळे, समद भोंगले, प्रीतम सुर्वे, मनोहर ठाकूर, मेघाताई दमडे यांसह शिवसेनेचे अनेक जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​खासदार श्रीरंग बारणे यांचे मार्गदर्शनातील महत्त्वाचे विचार:
​”वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या सूत्रानुसार आम्ही काम करत आहोत. राजकारण केवळ निवडणुकीपुरते मर्यादित ठेवून, विकासाच्या कामात आम्ही कधीही राजकारण आणत नाही.”नेहमी स्थानिक भूमिपुत्रांना मदत करीत आलो आहोत. उरण विधानसभा मतदार संघात सेफ्टी झोन व विविध समस्या सोडविण्याचे काम केले.विविध समस्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. जो पर्यन्त गोर गरिबांचे, बाधीतांचे प्रश्न सुटत नाही तो पर्यंत कार्यरत राहणार. सर्वच निवडणुकीत गेल्या ३ वर्षात महाराष्ट्रात २ नंबरचा पक्ष म्हणून शिवसेना कार्यरत आहे. निवडणुकीत सुद्धा जनतेने शिवसेनेला भरभरून चांगला प्रतिसाद दिला आहे. भविष्यात जनतेसाठी चांगले काम करायचे आहे. जिथे जिथे मदत लागेल तिथे तिथे मी जनतेच्या पाठीशी नेहमी उभा आहे. सर्वांनी हेवे दावे सोडून पक्ष वाढवा. मी तू पणा, स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवा. ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब जनतेसाठी काम करतात त्या पद्धतीने सर्वांनी उरण मध्ये काम करा. शिवसेना असा पक्ष आहे जो सर्वांना न्याय देतो, सर्वांच्या समस्या सोडवितो. सर्वांना सामावून घेतो असा पक्ष शिवसेना आहे. कार्यालयाचे उदघाटन झाले याचा मला सार्थ अभिमान आहे. उरण विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. निश्चितच या कार्यालयातून जनतेचे, गोर गरिबांचे प्रश्न समस्या सोडविले जातील असे मत व्यक्त करत खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी विविध पक्षातील शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.सदर कार्यक्रमाचे उत्तम असे सूत्रसंचालन राजेश पाटील तर आभार प्रदर्शन शहर अध्यक्ष सुलेमान शेख यांनी केले. एकंदरीत शिवसेना पक्ष कार्यलयाचे उदघाटन मोठया उत्साहात, उत्तम प्रतिसादात संपन्न झाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button