महिला दिनानिमित्त राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची उल्लेखनीय कामगिरी,डॉ, ज्योत्स्ना चेंबुरकर, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा प्रतिनिधी,डॉ, अथर्व चेंबुरकर, वाहतुक सेवा संघाचे ठाणे जिल्हा सहसचिव. यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी शिबिर आयोजित ,*

प्रतिनिधी ठाणे.
*महिला दिनानिमित्त राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची उल्लेखनीय कामगिरी, सौ,, ज्योत्स्ना चेंबुरकर, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा प्रतिनिधी,डॉ, अथर्व चेंबुरकर, वाहतुक सेवा संघाचे ठाणे जिल्हा सहसचिव. यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी शिबिर आयोजित ,*
आज रविवार ८ मार्च २०२६ महिला दिनानिमित्त ठाण्यातील वाघबीळ येथे आयोजित करण्यात आलेल्या या मोफत आरोग्य शिबिराचे वृत्त वाचून आनंद झाला. सामाजिक बांधिलकी जपत सौ,.ज्योत्स्ना आणि डॉ. अथर्व चेंबूरकर यांनी केलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे.
महिला दिनानिमित्त वाघबीळ येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न
ठाणे: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘डी क्लिनिक’च्या वतीने वाघबीळ, घोडबंदर रोड येथे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी विशेष वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराची प्रमुख वैशिष्ट्ये:
आयोजक: सौ,. ज्योत्स्ना अविश चेंबूरकर व डॉ. अथर्व अविश चेंबूरकर (डी क्लिनिक).
तपासणी: हाडांची घनता (Bone health) आणि डोळ्यांची दुर्बिणीद्वारे अत्याधुनिक तपासणी.
सेवा: गरजू रुग्णांना डोळ्यांचे नंबर तपासून चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
मार्गदर्शन: डॉक्टरांनी उपस्थित नागरिकांना हाडांचे आरोग्य आणि डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. या आरोग्य शिबिराला राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मा, श्रावण पाटील यांनी भेट दिली,
या शिबिरात वाघबीळ परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. रुग्णांना केवळ तपासणीच नाही, तर आजाराचे निदान करून आवश्यक औषधे आणि योग्य सल्लाही देण्यात आला.




