महाराष्ट्र

उरणला लोकनेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन.

शोकसभेला सर्व पक्ष नेत्यांची हजेरी अजितदादा यांना श्रद्धांजली वाहून अजित दादांच्या आठवणींना दिला उजाळा.

उरणला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे पूजन.

शोकसभेला सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी, अजितदादा यांना वाहिली श्रद्धांजली, अजितदादांच्या आठवणीला दिला उजाळा.

 

उरण दि ४(विठ्ठल ममताबादे )सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेला लोकनेता हरपला असल्याच्या भावना काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केल्या. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे नुकतेच मुंबईहून बारामतीकडे जाताना बारामती येथे विमान अपघातात दुःखद निधन झाले आहे. या घटनेने महाराष्ट्रसह देशभर शोक व्यक्त केला जात असताना, उरण राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(अजित पवार गट) उरण तालुका अध्यक्ष परिक्षित ठाकूर यांच्या वतीने उरण येथील आनंदी हॉटेलमध्ये अस्थिकलश पूजन व शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी वेळी महेंद्र ठाकूर हे आपल्या शोक भावना व्यक्त करताना बोलत होते.

 

यावेळी अस्थि कलशाचे पूजन करून, माणकेश्वर येथील समुद्रात अस्थींचे विसर्जन करण्यात आले. यापुढे बोलताना महेंद्र ठाकूर यांनी दादांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे प्रशासनावर त्यांची पकड होती. दादांच्या जाण्याने कधीही न भरून निघणारी संपूर्ण महाराष्ट्राची हानी झाली आहे. असे सांगितले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी राजकारणातील धुरंदर लोकाभिमुख नेतृत्व महाराष्ट्रने गमावले आहे. दादा हे दादाच होते. दादांच्या विशेष योगदानामुळे ते नेहमीच सर्वांच्या स्मरणात राहतील.अशा संतोष ठाकूर यांनी शोक भावना व्यक्त केल्या.

युवा नेते तेजस डाकी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना अजितदादा यांच्या आठवणीना उजाळा दिला. अजितदादा सारखे नेते पुन्हा होणार नाही दादा एक आदर्श राजकारणी होते असे मत व्यक्त केले. यावेळी उपस्थित परीक्षित ठाकूर यांनीही अजितदादा यांच्या अनेक आठवणी सांगितल्या अजितदादा यांची काम करण्याची पद्धत आदर्श होती. कोणतेही काम लगेच करायचे. दादांचे कार्य सर्वांना कायम लक्षात राहिल. अजितदादा सर्वांच्या हृदयात राहतील अजितदादा यांच्या जाण्याने राज्याचे, पक्षाचे व व्यक्तिशः माझेही नुकसान झाले आहे. अजितदादा यांची उणीव नेहमी भासत राहिल. अजितदादा यांच्या जाण्याने देशाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे मत परीक्षित ठाकूर यांनी व्यक्त केले.

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांबरोबर इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक स्पष्ट व निर्भीड व्यक्तिमत्व आपल्यातून हरपल्याच्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उरण तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर, उपनगराध्यक्ष रवि भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष समाधान म्हात्रे, राजिप माजी सदस्य वैजनाथ ठाकूर, राजिप माजी सदस्या कुंदा ठाकूर, राजिप माजी सदस्य विजय भोईर,आदर्श शेतकरी प्रकाश ठाकूर,ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो, पंचायत समितीचे माजी सदस्य दीपक ठाकूर, माजी सरपंच जितेंद्र घरत, प्रकाश ठाकूर,सीमा घरत, अँड भार्गव पाटील, मनोज भगत, चिंतामण गायकवाड, युवा नेते तेजस डाकी, रमाकांत म्हात्रे, नरेश घरत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहुन त्यांच्या आत्म्यास चिरशांतीसाठी प्रार्थना केली.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उरण तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर यांनी अस्थी कलश पूजन व शोक सभेचे आयोजन केले होते. अत्यंत शोकाकुल वातावरणात शोक सभा संपन्न झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button