महाराष्ट्र

उल्हासनगर लेवा पाटीदार एकता संघाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

आमदार अमोल दादा हरिभाऊ जावडे यांच्या उपस्थितीत संपन्न.

  1. *उल्हासनगर लेवा पाटीदार एकता संघाचे वार्षिक स्नेह संमेलन अतिशय उत्साहात संपन्न.*
    उल्हासनगर लेवा पाटीदार एकता संघ आयोजित सकल लेवा पाटीदार समाजाचे वार्षिक स्नेह संमेलन साठी मा.श्री.अमोलदादा हरिभाऊ जावळे(आमदार रावेर विधानसभा), मा.श्री.अरूणदादा मधुकर बोरोले(उद्योजक व अध्यक्ष,महाराष्ट् लेवा पाटीदार महासंघ) तसेच मा.श्री.किशोरजी डालू ढाके(संचालक,सोयो एनर्जीज प्राय लि.जळगाव,संचालक जि.लेवा पाटीदार मंडळ) प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.तसेच सत्कारमुर्ती मा.श्री रत्नाकर बळीराम चौधरी(संस्थापक व एम.डी.आर.बी ग्रुप ऑफ कंपनी,मुंबई), मा.श्री.सुजित सुधाकर झांबरे(यशस्वी उदयोजक)यांना आमंत्रित करण्यात आले होते.आजच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप- प्रज्वलनाने करण्यात आली.त्यासाठी नीलिमा भंगाळे यांनी सर्वांना व्यासपीठावर आमंत्रित केले. स्वागतगीत सौ.सरला बेंडाळे व सौ.कुंदा झोपे यांनी सादर झाले.
    उल्हासनगर लेवा पाटीदार एकता मंडळाचे उपाध्यक्ष मा.श्री.भास्कर पाटील यांनी मंडळाचे प्रास्ताविक सादर केले.
    व्यासपीठावरील सर्व प्रमुख पाहुणे,कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत नेहते,विशेष अतिथी,सत्कारमुर्ती यांचा शाल,श्रीफळ, पुष्प गुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
    तसेच सत्कार मुर्ती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौं.इंदिराताई तरे तसेच उल्हासनगर महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ.इंदिराताई पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
    कार्यक्रमा दरम्यान दहावी,बारावी गुणवंत विदयार्थी यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले तसेच महिलांसाठी पैठणी,पुरूषांसाठी ड्रेसचे लकी ड्राॅ काढण्यात आला.१ पैठणी श्रीमती सुनिता विलास पाटील,१ पैठणी सौं.कामिनी नितीन जावळे,१ पैठणी खान्देश मंडळ उल्हासनगर.यानी दिलेल्या पैठण्यांचे लकी ड्राॅ काढण्यात आले.तसेच अक्षय मुरलीधर राणे यांचे कडून ड्रेस,श्री.विकास गुणवंत नेहते यांनी दिलेल्या ड्रेसचे लकी ड्राॅ काढण्यात आले.तसेच उपस्थित असलेल्या समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
    कै.शशिकात राणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या पत्नी श्रीमती.प्रेमलता राणे व मुलगा अभिजित राणे यांनी एकावन्न हजार रूपये तसेच खान्देश सेना प्रमुख श्री.सुहासदादा बोंडे यांनी स्व.निखिलदादा एकनाथराव खडसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक लाख रूपयांची देणगी उल्हासनगर लेवा एकता संघास दिली,त्याचा धनादेश महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ चे अध्यक्ष मा.अरुण दादा बोरोले आणि खान्देश सेना उपाध्यक्ष नितीन जावळे यांनी सुपूर्द केला
    श्रीमती.सुनिता विलास पाटील यांनी मंडळाला पूजेचे ताट भेट दिले.उल्हासनगर लेवा पाटीदार एकता संघाकडून आभार व्यक्त करण्यात आले.
    सर्व प्रमुख पाहुणे,संमेलनाध्यक्ष , सत्कारमुर्ती या सर्वांनी समाज बांधवांना उपयुक्त असे मौल्यवान मार्गदर्शन केले.
    तसेच सौं.कांचन नेमाडे यांनी महिलांना एकत्र येण्यासाठीआवाहन केले.
    कार्यक्रम संपल्यानंतर सर्व समाज बांधव व पाहुण्यांनी पारंपारीक लेवा पाटीदार पद्धतीचे वरणबट्टी(बाफले) व वांग्याची भाजी,वरण भात या जेवणाचा आस्वाद घेतला.
    कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.साधारणतः बाराशे लेवा समाज बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या,मा.श्री भास्कर पाटील यांनी पाहुण्यांचे तसेच उपस्थित समाज बांधवांचे आभार मानले.तसेच त्यांनी उत्कृष्ट असे सूत्रसंचालन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सन्माननीय निळकंठ चौधरी,वसंत नेहेते,भास्कर पाटील,सतीश कोल्हे,उल्हास पाटील,प्रेमचंद सरोदे,श्रीराम चौधरी,संजय चौधरी,राजेंद्र फालक,नितीन जावळे,अनिल पाटील,भगवान इंगळे,हेमचंद्र बेंडाळे,दीपक नेमाडे,सौ. कांचन नेमाडे आणि सर्व कार्यकर्ते,सभासद,सल्लागार, संघटक, समाज बांधव,भगिनी यांच्या अथक प्रयत्नांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button