महाराष्ट्र

श्री गणेश हनुमान कला सर्कल ब्रास बँड कुंडेगाव कोळीवाडा यांनी द्वितीय क्रमांक व बेस्ट रिदम पारितोषिक पटकावले.

पत्रकार कैलासराजे घरत
खारपाडा पेण
श्री गणेश हनुमान कला सर्कल ब्रास बँड कुंडेगाव कोळीवाडा यांनी द्वितीय क्रमांक व बेस्ट रिदम पारितोषिक पटकाविले..!
संत रोहिदास सामाजिक, शैक्षणिक क्रीडा संस्था टाइगर ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित पालघर वाडा येथे झालेल्या भव्य दिव्य ब्रास बँड स्पर्धेमधे श्री गणेश हनुमान कला सर्कल ब्रास बँड कुंडेगाव कोळीवाडा यांचा द्वितीय क्रमांक व बेस्ट रिदम पारितोषिक मिळाले.
श्री गणेश हनुमान कला सर्कल ब्रास बँड कुंडेगाव यांनी 6 फेब्रुवारी 2026 रोजी वाडा पालघर खुल्या ब्रास बँड स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून कलेचे स्थान निश्चित राखले आहे या आधी गेल्या वर्षी 26 जानेवारी 2025 रोजी सांगोडे कल्याण येथे खुल्या ब्रास बँड स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला होता. हा ब्रास बँड कुंडेगाव पथक नेहमी बिझी शेड्युल असतो कामाच्या ड्यूटी तसेच कॉलेज, कोळी बांधव मच्छीचा धंदा सांभाळून खूप मेहनत करत बऱ्याच साखरपुडा, हळदी समारंभ, लग्न वरात, रिसेप्शन, कुलदैवत, देवींचे उत्सव सर्व ठिकाणी ऑर्डर घेऊन हमखास पब्लिक नाचणारच ही खासियत आहे. यासाठी गुरूवर्य मास्तर- अनिल पाटील फुलाजी पाटील मच्छिंद्र पाटील उमेश कोळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभते.⊇

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button