रायगड जिल्हा परिषद शाळा विंधणे येथे मराठी राज्यभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

कांतीलाल पाटील : नवी मुंबई प्रतिनिधी
विंधणे,दि.२७: रायगड जिल्हा परिषद उत्कृष्ट शाळा विंधणे येथे २७ फेब्रुवारी हा मराठी राज्यभाषा दिन वि .वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांनी नृत्य, भाषण अशा विविधपूर्ण कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मराठी भाषा आणि संस्कृतीचे महत्त्व सांगणारे भाषण दिले आणि नृत्य प्रस्तुत केले.
या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून केले होते. कार्यक्रमाचे उद्दिष्ट मराठी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे आणि त्यांना मराठी संस्कृतीशी जोडणे हे होते.
मराठी राज्यभाषा दिन साजरा करण्यामागे मराठी भाषेचे महत्त्व आणि त्याचा विकास यावर जोर देणे हा उद्देश आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राची राजभाषा आहे आणि तिचा गौरव करणे प्रत्येक महाराष्ट्रीयाचे कर्तव्य आहे.




