राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

प्रतिनिधी, मुंबई,
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
समाजातील अंधश्रद्धा, अशिक्षितपणा आणि अस्वच्छता दूर करण्यासाठी आयुष्यभर झटणारे गाडगे महाराज हे समाजप्रबोधनाचे तेजस्वी दीपस्तंभ होते. स्वच्छतेचा संदेश देत त्यांनी गावोगावी फिरून समाजमन जागृत केले. “स्वच्छता हीच सेवा” हा त्यांचा मूलमंत्र आजही तितकाच प्रेरणादायी आहे.
शिक्षण, समता, व्यसनमुक्ती आणि मानवसेवा यासाठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. कीर्तनांच्या माध्यमातून समाजाला जागृत करत त्यांनी सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली. गरिब, वंचित आणि शोषित घटकांसाठी त्यांनी आयुष्य अर्पण केले.
त्यांच्या कार्यातून मिळणारी प्रेरणा आपण सर्वांनी आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. स्वच्छ, सुशिक्षित आणि समताधिष्ठित समाज घडविण्याचा त्यांचा संदेश आपल्या कृतीतून जपूया.
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पवित्र जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यास व विचारांना विनम्र अभिवादन!
— नानासाहेब डी. खैरे.
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ, महाराष्ट्र.




