महाराष्ट्र

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाची नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील यांची सदिच्छा भेट*

*राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाची नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील यांना सदिच्छा भेट*

पनवेल प्रतिनिधी :
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आज पनवेल महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी महापौर नितीन पाटील यांनी अत्यंत आपुलकीने सर्व पदाधिकाऱ्यांची विचारपूस करत संघटनेच्या कार्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
येणाऱ्या काळात निश्चितपणे पुन्हा सविस्तर बैठक घेऊन, पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करू तसेच पनवेल महानगरीच्या विकासासाठी काय करता येईल, याबाबत एकत्र बसून समन्वयाने काम करू, असा विश्वास महापौर नितीन पाटील यांनी यावेळी दिला. पत्रकार व प्रशासन यांच्यातील समन्वय शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने महापौर नितीन पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी, राष्ट्रीय सचिव प्रवीण परमार, रायगड जिल्हा अध्यक्ष धनाजी पुदाले, रायगड जिल्हा सचिव राजपाल शेगोकार, रायगड जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र माघाडे, रायगड जिल्हा संघटक उमाजी मंडले तसेच रायगड जिल्हा संपर्कप्रमुख गणेश पराड हे प्रमुख पदाधिकारी व वंदे मातरम् रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष रवी नाईक हे पण आवर्जून उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button