महाराष्ट्र

दिनांक :- 18 फेब्रुवारी 2026* नागरिकांसाठी कायदेविषयक साक्षरता शिबीर* *शासन स्तरावरील विविध शासकीय योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ*

*दिनांक :- 18 फेब्रुवारी 2026*

*नागरिकांसाठी कायदेविषयक साक्षरता शिबीर*
*शासन स्तरावरील विविध शासकीय योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ*

*ठाणे,दि.18(जिमाका)* : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे यांच्यातर्फे रविवार, दि.22 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता विद्या प्रसारक मंडळ यांचे धोरले बाजीराव पेशवे सभागृह व पीकलबॉल व बास्केटबॉल मैदान, ठाणे महाविद्यालय परिसर, चेंदणी रोड, सिडको बस स्टॉप समोर,

ठाणे पश्चिम येथे नागरिकांकरिता कायदेविषयक साक्षरता शिबिराद्वारे विधी सेवा व सहाय्य तसेच शासन स्तरावरील विविध शासकीय योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ देण्याकरीता एकाच छताखाली प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. श्रीनिवास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नागरिकांसाठी शासनाद्वारे वेळोवेळी अनेक प्रकारच्या योजना कार्यान्वीत केल्या जातात. परंतु सर्वच नागरिकांपर्यंत या योजना पोहोचतात असे दिसून येत नाही व त्यासाठीच या महाशिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या महाशिबिरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, कामगार आयुक्तालय, तसेच सामाजिक क्षेत्रात विविध स्तरावर काम करणाऱ्या एन.जी.ओ. सहभाग घेणार आहेत.
या शिबीरात सर्व शासकीय विभागांमध्ये नागरिकांकरीता असलेल्या सर्व योजनांसाठी अंदाजे 30 ते 35 स्वतंत्र स्टॉल व तज्ञांचे मार्गदर्शन देण्यात येणार असून सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे व त्या योजनांचा लाभ मिळवून देणे हा महाशिबिराचा उद्देश असून महाशिबिरासाठी सर्व नागरिकांना मोफत प्रवेश आहे.

तरी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याकरीता सर्व स्तरातील नागरिकांनी जास्तीत जारत संख्येने सामील होण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे चे सचिव रविंद्र पाजणकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button