श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396 व्या जयंती निमित्त १२० रक्तदात्यांनी केले रक्तदान.

अजय भोसले
सामाजिक कार्यकर्ता
८१०८९४९१०२
महाराजांच्या जयंती दिनी १२० रक्तदात्यांनी केले रक्तदान.
ठाणे, १९ फेब्रुवारी -: श्री. स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे आयोजित श्री. शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्ताने रक्तदान शिबीरात १५० रक्तदाते नोंदणी त्यातून २५ हून अधिक रक्तदाते यांचे हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे, मासिक पाळी, मलेरिया आजार, डायबिटीस वजन कमी, वय कमी अशा कारणाने रद्द झाले. यात महिलांची संख्या जास्त आहे. त्यामुळे यंदा १२० रक्तदात्यांनी रक्तदान करून महाराजांना मानवंदना दिली. असे अध्यक्ष मा. श्री. रूपेश शिंदे, सचिव कु. अजय आंनदी महादेव भोसले, खजिनदार श्री. मंगेश निकम, यांनी सांगितल तर या उपक्रमात पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रीय सेवा योजनेचे एन.एस.एस, स्वयंसेवक निवेदक श्री. बंटी देसाई यांनी केले. स्थानिक आमदार संजय केळकर यांनी यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन करून कार्यक्रमाला शुभेच्छा देत म्हणाले की, रक्तदान व अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे जे सहज देणे शक्य होत नाही महाराजाचे शौर्य आपण पाहिले आहे त्यासाठी हे रक्तदान खूप मोलाचे ठरणार आहे. आज समाजात अनेक रॅली निघतात पण डी. जे च्या तालावर नाचतात पण गेली सहा वर्षे आपण सतत करीत असलेले हे शिवकार्य खूप मोलाचे ठरत आहे.

कळव्यातील लोकप्रिय नगरसेवक मा. श्री मंदार केणी दादा यांनी शुभेच्छा देताना म्हणाले की, गरजू व्यक्ती जेव्हा आपल्याला संपर्क करून रक्त मागतात तेव्हा नाही म्हणता येत नाही कारण रक्तदान हे एका वेळेस ५ जनाचे जीव वाचवण्यासाठी मदत होते त्यामुळे अनेकांनी शिबिर आयोजन करून देखील एवढे रक्तदाते जमा होत नाही जे आपण सामाजिक संस्था म्हणून दाखविले आहे. त्यातून आपण गरजूंना मदत करीत असतो. २०० ते ३०० रक्तदाते जेव्हा रक्तदान करतात तेव्हा २०० जणांचा जीव वाचतो. आपण जेव्हा समाजासाठी काम करीत असतो तेव्हा पक्षाच्या पुढे जाऊन समाजासाठी काम करताना निस्वार्थ पणे काम करीत राहिले पाहिजे. पुढे हेच आपल्या पाठीशी ठाम पणे आपल्या मागे उभे असतात.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक आमदार संजय केळकर, ड्रिन्मलॅन्ड रिॲलिटीचे अध्यक्ष दिपक मोरे व सहकारी, नगरसेविका उषा विशाल वाघ, नगरसेवक मंदार केणी, समाजसेवक, राखी प्रवीण खैरालिया, स्व. सचिन शिंदे दादा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राजक्ता शिंदे, निलेश कोळी, मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे, ठाणे शहर सहसचिव पवन पडवळ, मनसे ठाणे जिल्हा सचिव, रविंद्र सोनार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे उपशहर अध्यक्ष सचिन चव्हाण, कळवा विभाग प्रमुख विजय शिंदे, टेंभीनाका शाखा प्रमुख निखिल बुडजुडे व सहकारी, आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे, जयश्री फाऊंडेशनचे अध्यक्ष माधुरी पाटील, के. वी सेवा ट्रस्टचे अध्यक्ष हरीश गोगरी, सत्यमेव जयते फाऊंडेशनचे सचिव अँड. साहिल गायकवाड, अँड. वृषाली काकडे, चेतन मोरे, शिवसेना माजी नगरसेवीका पुजा वाघ, रोहन वाघ, शब्दमुद्रा संपादक पत्रकार प्रफुल्ल वाघोले, नवकेसरी संपादक सागर पाटील,
सकल मराठाचे ठाणे जिल्ह्या अध्यक्ष रमेश आंब्रे, मराठा समाज संघटनेचे अध्यक्ष मंगेश आवळे, मराठा उद्योजक विपूल शेवाळे, व सहकारी, मराठा सकल प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पालांडे, येऊरचे स्वामी विवेकानंद बालक आश्रमचे प्राची कसबेकर, विचार विमर्श संपादक हिरादास सोनावले, विलास सांवत, वैशाली न्यायनिगुर्णे., गायक, गीतकार आकाश खाजेकर, हरीश सुतार, बाल कलाकार राजलक्ष्मी बन यांनी पोवाडे, सादर करून लोकांचे लक्ष वेधले., श्री. गणेश तांबे ठाणे जिल्हा समन्वयक-शिवसेना प्रणित शिवसामर्थ्य सेना. व इतर मान्यवर या रक्त दान शिबीरात उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
ज्यांनी शिबिर पूर्णकरण्यासाठी मेहनत घेतली असे श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष स्नेहल गुळीग, सदस्य विपुल विचारे, किरण घोटाळे, सोमनाथ खोमणे, निशांत कोळी, अमोल पाटील, किशोर म्हात्रे, आरती गाढवे, अपर्णा आंग्रे, पुष्पा लोंढे, रोहित माळी, भाग्यश्री गिरी, पद्मा मेथिस, समीर डिके, बाळा म्हसकर, राजेंद्र गोसावी, पदाधिकाऱ्यांसह रक्त पेढी लोकमान्य टिळक रक्तपेढी, ठाणे यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला.




