लेवा स्पोर्ट्स क्लब तर्फे लेवा क्रिकेट प्रीमिअर लीग चे अंबरनाथ येथे आयोजन…

*लेवा स्पोर्ट्स क्लब तर्फे लेवा क्रिकेट प्रीमिअर लीग चे अंबरनाथ येथे आयोजन…*
अंबरनाथ येथील लेवा स्पोर्ट्स क्लब तर्फे लेवा क्रिकेट प्रीमियर लीग-लेवा युनिटी चषक,सीझन १ (२०२६) या भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे,ही स्पर्धा रविवार,दि.२२ फेब्रुवारी २०२६ रोजी ग्रीनलँड टर्फ,पालेगाव,अंबरनाथ (पूर्व) येथे आयोजित करण्यात आली असून स्पर्धेचा शुभारंभ सकाळी ८.०० वाजता होणार आहे,स्पर्धेचा शुभारंभ डॉ.श्री.गुणवंत भंगाळे सर (सोनम ट्युशनचे संचालक), शिरीष बेंडाळे (ओम टेक्नोचे संचालक) आणि मिलिंद चौधरी (मेडीमेकचे संचालक) विजय वराडे (वराडे बिल्डकॉनचे संचालक)यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या स्पर्धेमध्ये एकूण १० संघांचा सहभाग असून त्यामध्ये जळगाव (१ संघ),कल्याण (२ संघ),उल्हासनगर (२ संघ),अंबरनाथ (३ संघ) आणि बदलापूर (२ संघ) येथील संघांचा उत्साहपूर्ण सहभाग आहे.
स्पर्धेतील बक्षिसे पुढीलप्रमाणे देण्यात येणार आहेत —प्रथम बक्षीस : ₹७७७७/-,द्वितीय बक्षीस : ₹५५५५/-,तृतीय बक्षीस : ₹३३३३/-,तसेच विजेत्या संघांना ट्रॉफी आणि सन्मान चिन्हे सुद्धा प्रदान करण्यात येणार आहेत.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सायंकाळी ८.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या समारंभासाठी प्रमुख मान्यवर म्हणून मा. श्री सुहास दादा बोंडे (खान्देश सेना प्रमुख), नितीन जावळे (खान्देश सेना उपाध्यक्ष),हर्षला नेमाडे (संचालक-स्वरा इंजिनिअरिंग),प्रतीक वराडे (संचालक-वराडे बिल्डकॉन), समीर चौधरी (संचालक-चौधरी बिल्डर),भूषण चौधरी,विशाल खाचणे,निशाताई अत्तरदे,प्रतिभाताई वराडे आणि इतर सन्माननीय मान्यवर उपस्थित राहून खेळाडूंना बक्षीस वितरण करणार आहेत.
स्पर्धेदरम्यान सर्व खेळाडूंसाठी टी शर्ट तसेच सकाळचा नाश्ता,दुपारचे जेवण तसेच सायंकाळचा नाश्ता यांचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे.
समुदायातील क्रिकेटप्रेमी खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे,क्रीडा भावना वृद्धिंगत करणे तसेच एकात्मता मजबूत करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे,लेवा स्पोर्ट्स क्लबतर्फे सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अंबरनाथमध्ये ३० पेक्षा जास्त सदस्य असून हा उपक्रम सर्व सदस्यांच्या एकजुटीने राबविण्यात येत आहे.सदरची स्पर्धा कमी कालावधीत यशस्वी करण्यासाठी समाजाच्या प्रत्येक व्यक्तीने पाठिंबा दिल्याने ही स्पर्धा यशस्वी होत आहे,या स्पर्धेच्या आयोजनाची प्रमुख जबाबदारी भूषण चौधरी,लोकेश चौधरी,किरण नेमाडे,कृष्णा महाजन,प्रतीक वराडे आणि समीर चौधरी, पंकज नारखेडे हे आयोजक म्हणून सांभाळत असून ते स्पर्धेच्या सर्व बाबींचे नियोजन व व्यवस्थापन पाहत आहेत,-लेवा स्पोर्ट्स क्लब,अंबरनाथ.



