महाराष्ट्र

कल्याण लोकसभा खासदार संसद रत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या चार तारखेला वाढदिवसानिमित्त खारेगाव दत्तवाडी खारभूमी मैदान येथे लोकनाथ कबड्डी स्पर्धेचे 2026 चे आयोजन करण्यात आले आहे.

लोकनाथ कबड्डी स्पर्धा 2026 चे उद्घाटन आज नवनिर्वाचित शिवसेना महापौर शर्मिला गायकवाड व उपमहापौर कृष्णा दादू पाटील यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

*कळवा येथील खारलँड मैदान येथे लोकनाथ चषक 2026, भव्य जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते संपन्न

ठाणे :-खासदार डॉ श्रीकांत शिंदे, यांच्या चार तारखेला असलेल्या वाढदिवसा निमित्त आणी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नऊ तारखेच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 4,5,6,7,8,9 फेब्रुवारी 2026 दरम्यान कळवा येथील सह्याद्री शाळेसमोरील खारलँड मैदान येथे भव्य
जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धा, लोकनाथ चषक 2026 चे आयोजन जय महाराष्ट्र माथाडी आणी जनरल कामगार सेना ठाणे यांनी केले आहे, या स्पर्धेचे उद्घाटन आज ठाणे महानगर पालिकेच्या नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळोलकर- गायकवाड व नवनिर्वाचित उपमहापौर श्री कृष्णा दादू पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले, सदरप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख नरेंद्र शिंदे नगरसेविका प्रमिलाताई केणी नगरसेविका विजया लासे नगरसेविका प्रियांका पाटील मा, नगरसेवक उमेश पाटील, नगरसेवक गणेश कांबळे मा. नगरसेवक उमेश पाटील माजी उपमहापौर मनोज लासे स्पर्धेचे आयोजक राजा ठाकूर, विकास दाभाडे, उदय परमार, असून निमंत्रक ऍड पूजा राजा ठाकूर तसेच त्याप्रसंगी विजय शिंदे विभाग प्रमुख उपशहर प्रमुख राकेश पाटील,

समाजसेविका रचना पाटील, जयप्रकाश (सिद्धू) यादव,अरविंद सैतावडेकर उपशहर प्रमुख नथू पाटील शाखाप्रमुख महेश गवारी शाखाप्रमुख रोहन शिंदे, राहुल सिन्नलकर, निनाद बोराडे, संदीप चौहान, युवा सेना अध्यक्ष ओमकार चव्हाण, शाखाप्रमुख दिनेश करलै उपस्थित होते ,

,त्याप्रसंगी महापौर म्हणायले की कबड्डी हा महाराष्ट्राचा सहशी आणि रांगडा खेळ असून तरुण पिढीला प्रोत्साहन मिळावे म्हणून या स्पर्धेचे आयोजन केले आहे, मोबाईल मध्ये अडकलेल्या तरुण पिढीला या खेळाकडे वळावे त्यांनी मैदानी आपल्या मातीतले खेळ खेळावेत यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्याची उद्दिष्ट आहे, या स्पर्धेमध्ये महिला संघाचा पण मोठ्या प्रमाणात सहभाग आहे,
ह्या कार्यक्रमा विषयी ऍड पूजा राजा ठाकूर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली
तसेच महापौर शर्मिला पिंपळोलकर- गायकवाड व उपमहापौर श्री कृष्णा दादू पाटील यांनी ही कार्यक्रमाचे उत्कृष्ठ आयोजन केल्याबद्दलं आयोजकांचे कौतुक करत आभारही मानले.
सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट दयावी असे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button