“खानदेश कन्या,” निसर्ग कन्या”कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी खानदेश सेना प्रमुख मा, सुहास दादा बोंडे..

प्रतिनिधी कल्याण,. नितीन जावळे,
*खान्देश कन्या,निसर्ग कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना भारतरत्न पुरस्कार दयावा….*
*खान्देश सेना प्रमुख सुहास बोंडे.*
जळगांव येथील प्रसिद्ध लोकसेवक मधुकरराव चौधरी सोशल कॉलेज मध्ये महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ आयोजित ऐतिहासिक सकल लेवा पाटीदार युवती आणि महिला अधिवेशनात बोलतांना खान्देश सेना प्रमुख सुहास दादा बोंडे म्हणाले की,जेष्ठ साहित्यिक लेवा पाटीदार समाजभूषण कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना भारत सरकार ने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे.
सदर कार्यक्रमात खान्देश सेनेचे अध्यक्ष श्री.सुहासदादा बोंडे यांनी उल्हासनगर लेवा पाटीदार एकता संघाला स्व.निखिल एकनाथराव खडसे यांच्या स्मरणार्थ एक लाख रुपये देणगी चा धनादेश जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक च्या मा.चेअरमन ॲड.रोहिणी ताई खडसे खेवलकर,महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ चे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक श्री.अरुण दादा बोरोले आणि खान्देश सेनेचे उपाध्यक्ष, उल्हासनगर लेवा पाटीदार एकता संघ चे कार्यकारिणी सदस्य श्री.नितीन जावळे यांच्या कडे सुपूर्द केला.
नुकतेच भारतीय टपाल विभाग (जनरल पोस्ट ऑफिस मुंबई)ह्यांच्या तर्फे खान्देश सेनेचे अध्यक्ष सुहास दादा बोंडे यांचे टपाल तिकीट काढण्यात आले होतें म्हणून ह्या अधिवेशनात त्यांचा यथोचित सत्कार सन्मान देखील करण्यात आला,ह्या सकल लेवा पाटीदार समाजाच्या युवती व महिला अधिवेशनाचे वैशिट्य म्हणजे महाराष्ट्र, गुजरात,मध्य प्रदेश आणि जगातील काना कोपऱ्यातून आलेल्या लेवा पाटीदार समाज बांधव आणि विशेषत: महिला भगिनींची हजारोंच्या संख्येने उपस्थिती दिसून येत होती.
सदर युवती व महिला अधिवेशन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ चे सर्व पदाधिकारी,कार्यकारी मंडळ, महिला भगिनी, समाज बांधव, भगिनी, कार्यकर्ते,अगदी सर्वांनीच खुप परिश्रम घेतले.




