महाराष्ट्र

गव्हाण पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीचे राष्ट्रीय कामगार नेते व काँग्रेस जिल्हा अध्यक्ष मा,महेंद्रशेठ घरात सहपत्निक मतदान केले.

महेंद्रशेठ घरत यांनी सपत्नीक केले मतदान!

उरण दि ७(विठ्ठल ममताबादे )गव्हाण पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत आणि सौभाग्यवती शुभांगीताई यांनी सपत्नीक
गव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेत शनिवारी मतदान केले.
यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “मतदान करणे पवित्र हे कार्य आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आणि सुदृढ होण्यासाठी मी मतदान केले आहे. कार्यकर्ते विरुद्ध नेते अशी गव्हाणमध्ये लढत होईल. कारण ज्या कार्यकर्त्यांनी भाजपसाठी अकरा वर्षे काम केले त्यांना डावलून रामशेठ ठाकूर यांनी आपल्याच बगलबच्च्यांना उमेदवारी दिली आहे.

त्यामुळे भाजप कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. जिल्ह्यात हीच परिस्थिती सगळीकडे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमतांनी निवडून येतील आणि महाविकास आघाडीची सत्ता जिल्हा परिषदेवर आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांवर येईल, असा मला शंभर टक्के विश्वास आहे.
यावेळी महेंद्रशेठ घरत यांनी उरण आणि पनवेल तालुक्यातील विविध मतदान केंद्रांवर भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button