छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात संपन्न.* *कळवा येथे जन स्वराज्य वेल्फेअर ट्रस्ट व भाजपा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा.*

प्रतिनिधी ठाणे.
19 फेब्रुवारी 2026
*छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात संपन्न.*
*कळवा येथे जन स्वराज्य वेल्फेअर ट्रस्ट व भाजपा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा.*
जन स्वराज्य वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष मा,राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील कळवा पारसिक नगर येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा,
शिवजन्मोत्सव वर्ष सहावे, जन स्वराज्य वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष मा, राजन पाटील हे कळवा खारेगाव पारसिकनगर या विभागात जनसेवेच्या माध्यमातून समाजकार्य करत असतात, सहा वर्षापासून पारसिक नगर कळवा विभागात वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनस्वराज्य वेल्फेअर ट्रस्ट नागरिकांच्या सेवेत तत्पर असते, गेल्या वर्षी जन स्वराज्य वेल्फेअर ट्रस्ट मार्फत आरोग्य तपासणी शिबिर, आषाढी एकादशीला भाविकांसाठी फराळ वाटप,महाशिवरात्रीला गुजरात सोमनाथ येथून दोन हजार रुद्राक्ष, मंत्रोपचार करून भारतीय जनता पार्टी ठाणे आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे, ठाणे भाजपा अध्यक्ष अँड,संदीप लेले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले, नवरात्रीला नवदुर्गांना मानचिन्ह व साडी देऊन गौरविण्यात आले, आधार कार्ड, रेशन कार्ड, गुमास्ता लायसन, उद्योग आधार, जातीचा दाखला, आभा कार्ड असे उपक्रम नेहमी राबवत असतात, तसेच 90 फिट रोड पारसिक नगर येथे आठवडे बाजाराची सुरुवात कोकण पदवीधर आमदार अँड ,निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आली,
आज शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने सकाळ पासून रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, मोफत आरोग्य तपासणी शिबिर अश्या विविध स्पर्धांचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते,
सकाळी भारतीय जनता पक्षाचे महिला आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष सौ ,हर्षला बुबेरा, प्रशांत पडळकर, दीपिका शिरसागर, मनजीत जाधव, अध्यक्ष,राजन पाटील व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली, व कार्यक्रमाला सुरूवात केली,
संध्याकाळी 6 वाजेनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर व्याख्यान व गायक नंदेश उमप यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर आधारित पोवाड्यांचा कार्यक्रम सुरू झाला, या कार्यक्रमाचे अध्यक्ष ठाणे भाजपा आमदार मा, संजय केळकर यांच्या हस्ते नंदेश उमप व सत्कारमूर्ती आगरी सेना अध्यक्ष मा, राजाराम साळवी यांचा शाल व पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला,
शिवसेना नेते मा, दशरथ दादा पाटील,यांचाही शाल व पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष राजन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तसेच ठाणे महानगरपालिकेचे नवनियुक्त उपमहापौर श्री,कृष्णा पाटील यांनीही या शिवजयंती कार्यक्रमाला हजेरी लावली, याप्रसंगी जन स्वराज्य वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष राजन पाटील यांनी त्यांच्या शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले,
भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मा, संदीप लेले, मा, नगर सेवक,संजय वाघुले, नवनियुक्त नगरसेवक मा,मनोहर डुंबरे, शिवसेना नगरसेविका, सौ, अनिता गौरी, नगरसेविका विजया लासे, मा, नगरसेवक उमेश पाटील,समाज सेविका, शिवसेना कळवा मुंब्रा संघटक, सौ,रचना पाटील, कळवा खारेगाव विभाग प्रमुख, मा, विजय शिंदे शिवसेना कळवा खारेगाव उपविभाग प्रमुख मा,राकेश पाटील व पदाधिकारी यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष मा राजन पाटील यांनी सत्कार केला,
त्यानंतर शिवजयंती कार्यक्रमाचा गायक नंदेश उमप यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर आधारित पोवाड्यांचा कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.




