भिवंडी अंजुरफाटा नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ट्रक अपघातात एका लहान दोन वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू.
पुढील तपास नारपोली पोलीस स्टेशन ए,पी,आय, केदार साहेब व त्यांची टिम करीत आहे.

प्रतिनिधी ठाणे,
भिवंडी हलवा पाडा अंजीर फाटा नारपोली पोलीस स्टेशनच्या हार्दिक ट्रक अपघातात दोन वर्षाच्या लहान मुलाचे दुर्दैवी मृत्यू ,(मृत्यू पावलेला मुलाचे नाव:अहमद संजान सलमानी) मुलगा हा घराच्या बाहेर खेळत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने मुलाला उडवले, चालक घाबरून गाडी सोडून पळून जात असताना स्थानिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले, मुलाला उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कलवा येथे आणण्यात आले परंतु डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले, मुलाचे वडील हे हात मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवतात, मुलगा हा गरीब घरातला आहे, म्हणून त्याला न्याय मिळावा त्यासाठी ठाण्यातील शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख खाटीक समाज, शोएब शेख व त्याचे मित्र शाहरुख पठाण व शिवसेना वैद्यकीय सहाय्यक कक्ष, इसरार सामानी यांनी प्रशासनाकडे मागणी केली की मुलाला न्याय मिळाला पाहिजे, तोपर्यंत आम्ही मृतदेह हा उचलणार नाहीत, ठाण्यातील शिवसैनिक व पदाधिकारी आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व ठाण्याचे पोलीस कमिशनर आशुतोष डुंबरे साहेब यांच्या पर्यंत आम्ही जाऊन आमची तक्रार दाखल करणार आहोत, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.पुढील कार्यवाही नारपोली पोलीस स्टेशनचे ए,पी,आय ,केदार साहेब यांना विचारले असता त्यांनी सांगितले अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे, पुढील कारवाई आम्ही कायदेशीर करणार आहोत, या घटनेच्या तपास नारपोली पोलीस स्टेशनचे ए,पी,आय, केदार साहेब व पोलीस हवालदार महेश चौधरी व पोलीस कॉन्स्टेबल राऊत व त्यांची टीम करीत आहे.




