आंतरशालेय क्रीडा रेसिंग स्पर्धेत धार गावातील संकेत केशव पाटील याने महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळवला.
धार गावातील संकेत केशव पाटील याने महाराष्ट्रात आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत 50 किलो वजनी गटात दुसरा क्रमांक पटकाविला क्रीडा प्रेमींनी शुभेच्छांचा वर्षाव केला .

प्रतिनिधी, अमळनेर,
धार गाव, तालुका अमळनेर जिल्हा जळगाव येथील एक लहान गावातील संकेत केशव पाटील उर्फ (ओम) याची राज्यस्तरीय मास रेसलिंग या ठिकाणी झालेल्या आंतरशालेय स्पर्धेत 50 किलो वजनी गटात दुसरा क्रमांक पटकावून सिल्वर मेडल मिळवल्याबद्दल धार गावातील व तालुक्यातील नागरिकांनी व क्रीडा प्रेमींनी संकेत पाटील याला खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा दिल्या, संकेत याने या परीक्षेसाठी शर्थीचे प्रयत्न केले रात्र दिवस मेहनत केली, व आपल्या बोरसे परिवाराचे नाव व धार गावाचे नाव मोठे केले, रेसिंग स्पर्धेत राज्य स्तरीय दुसरा क्रमांक पटकावून महाराष्ट्रात धार गावचा झेंडा रोवला,तसेच आपल्या धारगावाचे नाव मोठे केले. संकेत पाटील यांना न्युज 04 महाराष्ट्र चॅनल परिवाराकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, तुला आई कुलस्वामिनी पेडकाई माता असंच यश मिळू दे अशी मातेच्या चरणी प्रार्थना…💐💐*




