महाराष्ट्र

आम्ही भूमीपुत्र कलाकार प्रीमियर लीग-2026″ डे नाईट क्रिकेट सामने मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न..!

अमन कैलास वास्कर आयोजित आम्ही भूमीपुत्र कलाकार प्रीमियर लीग 2026. डे नाईट क्रिकेट सामने कुंडेवहाळ गावच्या औटी

पत्रकार कैलासराजे घरत
रायगड विभाग संपादक
“आम्ही भूमीपुत्र कलाकार प्रीमियर लीग-2026”
डे नाईट क्रिकेट सामने मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न..!
अमन कैलास वास्कर आयोजित आम्ही भूमीपुत्र कलाकार प्रीमियर लीग 2026. डे नाईट क्रिकेट सामने कुंडेवहाळ गावच्या औटी
मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर पुरोगामी पत्रकार संघाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख महाराष्ट्र भूषण-कोंकणरत्न पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत. अष्टगंध सांस्कृतिक कलामंच अध्यक्ष श्री अशोक म्हात्रे साहेब उपस्थित होते. आयोजकांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. अमन वास्करच्या डे नाईट क्रिकेट मॅचेससाठी सर्व कलाकार खेळाडूंच्या टीमने अमन वास्कर यांचे तोंडभरून कौतुक केले. या स्पर्धेत १)D.P.फायटर्स २)बहिरीनाथ कलाप्रेमी चॅनेल ३) A.N.क्रिएशन ४) AB इंडियन्स ५) टीम अगाव आणि रोशन अण्णाची कॉमेडी ६) सृष्टी स्पोर्ट्स अशा एकूण ६ संघानी यात सहभाग घेतला होता. D.P.फायटर्स टीमने बाजी मारत प्रथम क्रमांक मिळवत अंतिम विजेता ठरला.

तर बहिरीनाथ कलाप्रेमी युट्यूब चॅनेल दुसरा नंबर पटकावताना संघ मालक स्पॉन्सर विक्रम ठाकूर धुतूम, संस्कृती ठाकूर यांचे मोलाचे योगदान विक्रम ठाकूर धुतूम, अमर म्हात्रे मोरावे, प्रतीक ठाकूर बेलपाडा यांनी उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षण भारी कामगिरी करत सर्वांनी सायकल बक्षीस मिळवल्या त्याचप्रमाणे बहिरीनाथ कलाप्रेमी लेडीज कलाकार देवयानी दिगंबर कोळी यांच्या टीमने शो मॅचमध्ये विजय मिळवला कर्णधार दिगंबर कोळी आणि त्यांचे सर्व खेळाडू चाहते यांनी प्रशंसा करत शुभेच्छा दिल्या. कलाकार म्हटलं तर प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली कला सादर करत असताना अथक परिश्रम घेत असतात परंतु प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असतात. आपण त्यांना नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो परंतु सर्वांना एकत्र पाहणं शक्य होत नसतं परंतु एक उत्तम कलाकार सर्वांना एकत्रित घेऊन अशक्यप्राय गोष्ट शक्य करणारा अमन कैलास वास्कर यांनी सर्व कलाकारांना एकत्रित आणण्याचं काम क्रिकेटच्या माध्यमातून केलं आणि आम्ही भूमिपुत्र कलाकार प्रीमियर लीगचे दिमाखदार आयोजन केले. या प्रीमियर लीगमध्ये सर्व कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अगं पापलेटवाली फेम -चिंतामण शिवडीकर, राजेश खर्डे-वेसावकर आणि मंडळी निर्माता, आगरी कोळी अभिनेत्री रंजिता पाटील,
साधन भोईर-दिग्दर्शक एडिटर,सौ.वृषाली साधन भोईर-हॉटेल जस्ट इन लोणावळा मालक,विनायक यू-ट्यूबर, रश्मिता पोपेटा-आरभाई फेम यू-ट्यूबर, आकाश म्हात्रे-निर्माता, रजनी मेढेकर यू-ट्यूब स्टार, गायिका वैशाली म्हात्रे, विकिता म्हात्रे-यू-ट्यूबर ब्लॉगर, राजश्री कोळी-नाट्यकलाकार रिळस्टार, उपासना घोसाळकर-नाट्यकलाकार लॉयर, दर्शना ठाकूर नाट्यकलाकार, सुप्रसिद्ध गायक सोमनाथ कोळी, अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार, कुंडे वहाळ गावच्या औटी मैदानावर उपस्थित होते. सर्व कलाकारांच्या उपस्थितीमध्ये आम्ही भूमिपुत्र प्रीमियर लीग मोठ्या आनंदाने संपन्न झाली.

स्पर्धेसाठी पंच हरिश्चंद्र फडके-वलवली, लालचंद गावंड-वाघिवली वाडा, राजेश पाटील-पारगाव. गुणलेखक सोमनाथ पाटील-वाजे, समालोचक मनोज म्हात्रे-मोरावे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने ही क्रिकेट स्पर्धा अतिशय जल्लोषात साजरी झाली. या स्पर्धांचे कुंडेवहाळ, उरण, पनवेल, नवी मुंबई परिसरातील भूमिपुत्रांकडून कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button