आधार तीर्थ आश्रम त्र्यंबकेश्वर अंजनेरी येथील विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मुलगा चिरंजीव अशोक व चि. सौ. कांता. गौरी तिचा विवाह थाटामाटात पार पाडला*

प्रतिनिधी ठाणे.
*आधार तीर्थ आश्रम त्र्यंबकेश्वर अंजनेरी येथील विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मुलगा चिरंजीव अशोक व चि. सौ. कांता. गौरी तिचा विवाह थाटामाटात पार पाडला*
आज महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं खूप आनंदित होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद उसळून वाहत होता. कारण आज त्यांच्या भावाचं लग्न होतं. सर्वच मुलं मुली आपल्या आई-वडिलां समान मान्यवरांचे हार्दिक स्वागत करत होते.
आधारतीर्थ आश्रमातून सासरी गेलेल्या मुली आपल्या मुलाबाळा सह आपल्या भावाच्या लग्नासाठी आवर्जून उपस्थित होत्या. काही अधिकारी मुलं जातीने हजर राहून आलेल्या मान्यवरांची सेवा करत होते. विवाह प्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी उल्हासनगरचे उपमहापौर धनंजय आबा .
पुढारीचे संपादक चव्हाण साहेब अमरावतीचे डेप्युटी कलेक्टर कुलकर्णी साहेब. अहिल्यानगरचे रेसिडेन्शियल कलेक्टर पाटील साहेब. नाशिक ग्रामीणचे पोलीस उपाधीक्षक देसले साहेब, डीवायएसपी मोरे साहेब. हायकोर्टातील वकील पवार मामा, संरक्षण दलातील अनेक अधिकारी.
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील अनेक अधिकारी व अनेक मान्यवर आश्रमातील संपूर्ण बालचिमुकले यावेळी हजर होते. आश्रमातील कुमारी काजल सोनवणे या मुलींनी सांगितलं वडिलांनी आत्महत्या केल्यामुळे मला मराठवाड्यातून त्र्यंबकेश्वरला यावा लागल. याच खूप मोठे दुःख आहे .
मी आदर्श घेतलेला आहे आई जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा. आदर्श घेऊन मी माझ्या जीवनाची वाटचाल करत आहे. किती माणूस भिकारी असला तर आई-वडील असायला पाहिजे. आम्ही कम नशीब आहोत .आमचे आई-बाबा आज हयात नाही. मी सर्व मध्यमवर्गीय समाज बांधवांना आव्हान करते .की आपले पैसे आहेत. आनंद साजरा करा. पण इतरांची नक्कल करू नका. कर्ज काढून आपला आणि आपल्या कुटुंबाचा सन्मान गमावू नका. आपल्या क्षमतेनुसार खर्च करा. चार-पाच तासासाठी आयुष्यभराची कमाई खर्च करू नका. सर्व गावाला फेटे बांधू नका. मोठा बँड बाजा लावू नका तुमचं लग्न हे तुमच्या आई-वडिलांचे त्यागच फलित आहे .आणि त्याचं मूळ तुम्हाला फक्त स्वतः आई वडील झाल्यावर कळेल. आपलं वैवाहिक आयुष्य अभिमानाने व आत्म सन्मानाने सुरू करा .आणि स्वतःला आपल्या कुटुंबासाठी व समाजासाठी योग्य सिद्ध करा.
आश्रमात आल्यामुळे मला गायकवाड आप्पांच्या रूपाने वडील भेटले. त्यामुळे मी देवाचे आभार मानते. व तुम्हाला कळकळीची विनंती करते की. आत्महत्या हा पर्याय नाही. आत्महत्या करू नका व्यसन करू नका. सर्व गावाला फेटे बांधू नका. व आपल्या मुलाबाळांमध्ये भगवंत बघा. हे सर्व भाषण चालू असताना सगळ्या मान्यवरांच्या डोळ्यात अश्रू होते .
पोलीस उपाधीक्षक देसले साहेबांनी सांगितलं कुंभमेळ्याच्या कामामुळे मी खूप व्यस्त आहे. पण माझ्या नातेवाईकाच्या लग्नाला गेलो नसतो. पण एक अनाथ मुलगा म्हणून आई-वडिलांच्या रूपात मी आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी सहपरिवार आलो आहे.
सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की आत्महत्या करू नका. व्यसन करू नका . खूप संघर्ष करा. व आपल्या जीवन सुखमय करा. असा मोलाचा संदेश त्यांनी दिला .अनेक मान्यवरांचे मुलांना आशीर्वाद पर भाषण झाली. व संजय देशमुख साहेब यांनी सांगितलं अनेक देव माणसांमुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे जीवन सुखमय झालं. अनेक मुलं स्वतःच्या पायावर उभे राहिले हे मी जवळून बघितलं. संघर्ष मुलांना सर्व काही शिकवतो . या मुलांना रिकाम्या हाताने, रिकाम्या किशाने, रिकाम्या पोटाने जे शिकवलं ते कोणत्याही शाळेत किंवा विद्यापीठात कोणीही शिकू शकत नाही. आता चार महिन्यापूर्वी अतिवृष्टी करून पाऊस जिंकला. भाव पाडून व्यापारी जिंकला .खोटे बोलून सरकार जिंकले.
कष्ट करून हरला तो फक्त माझा शेतकरी. पाण्यात गेलं ते फक्त पीक नव्हतं. तर शेतकऱ्यांची स्वप्न, कष्ट आणि लेकरांची दिवाळी आणि शाळेची फी देखील वाहून गेली. आणि उद्या ही मुलं ह्या संघर्षातून उद्याचे कर्तबगार भारताचे नागरिक बनतील यात मला शंकाच नाही आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वांना आधार तीर्थाच्या वतीने मी धन्यवाद देतो. व सर्वांचे आभार मानतो




