महाराष्ट्र

ठाण्यात भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे महापौर व उपमहापौर बिनविरोध निवड झाली.

उपमुख्यमंत्री मा, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ठाण्यात शिवसेनेचे महापौर व उपमहापौर यांची नियुक्ती करण्यात आली.

प्रतिनिधी ठाणे,

ठाण्यात महापौर उपमहापौर पदाची निवड बिनविरोध.
ठाणे महापालिकेचे निवडणूक युतीत लढविण्यात आली असल्यामुळे महापौर पद द्या अन्यथा विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावू, असा हट्ट धरणाऱ्या भाजपने अखेर माघार घेत शिवसेना (शिंदे गट) पक्ष सोबत सत्तेत सहभागी होण्याच्या निर्णय घेतला, शिवसेना (शिंदे गट) पक्षातर्फे महापौर पदासाठी शर्मिला पिंपळोडकर तर भाजप तर्फे उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले, त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल झालेले नसल्यामुळे दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री मा,एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महापौर व उपमहापौर यांची निवड करण्यात आली, ही निवड ठाणे महानगर पालिकेचे नवनियुक्त नगरसेवक यांना सव्वा वर्षे सव्वा वर्षे असे चार टर्म ठाणे महानगरपालिकेत चार महापौर व चार उपमहापौर 2026 मध्ये निवडले जातील, नवनियुक्त चार नगरसेवक यांना महापौर व उपमहापौर बनण्याच्या मान मिळेल, ही घोषणा उपमुख्यमंत्री मा, एकनाथ शिंदे यांनी महापौर उपमहापौर निवड करताना केली, महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत ठाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के, आमदार,रविंद्र पाठक, भारतीय जनता पार्टीचे,आमदार, संजय केळकर, आमदार, निरंजन डावखरे, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिवसेना शिंदे गटाचे नवनियुक्त नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थिती लावली,या घोषणेमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाणेकरांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button