शिवसेना भारतीय जनता पार्टीचे कळवा प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार अनिता गौरी बहुमतांनी विजयी.
ठाणे महानगरपालिका व महाराष्ट्रातील 27 महानगरपालिकेच्या विजयात भारतीय जनता पार्टी व शिवसेना चे वर्चस्व.

1प्रतिनिधी ठाणे,
*महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेतील 25 पालिकेवर महायुतीचा भगवा फडकला,*
महानगरपालिकेचा महा निकाल, महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांनी घवघवीत यश मिळवले, 29 महानगरपालिकेतील 24 ते 25 महानगरपालिकेत शिवसेना भारतीय जनता पार्टीने एक हाती सत्ता मिळवली, मुंबई महापालिकेची सत्ताही भारतीय जनता पार्टी व शिवसेनेने काबीज केली, महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी उदयास आला, ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला, तीस वर्षापासून असलेली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाची सत्तेला भारतीय जनता पार्टी महायुतीने सुरुंग लावला व विजय खेचून आणला, ठाण्यात शिवसेनेचे 75 व भाजपचे 28 असे 131 मध्ये 103 बहुमतांनी उमेदवार विजयी झाले, शिवसेना शिंदे गटाने एक हाती सत्ता स्थापन केली, संपूर्ण महाराष्ट्रभर 29 महानगर पालिकांमध्ये भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गटाने मुसंडी मारली. शिवसेना शिंदे गटाच्या ठाण्यात प्रभाग क्रमांक 9 खारेगाव पारसिक मध्ये शिवसेनेचे तीन उमेदवार 1) अँड ,अनिता गौरी 2) गणेश कांबळे 3) विजया लासे बहुमतांनी विजयी झाले, शिवसेना उबाठा गटाला मुंबई महानगरपालिकेत व महाराष्ट्र भर तारेवरची कसरत करावी लागली, मुंबईत मराठीचा मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी महायुती व उबाठा मध्ये काटेची टक्कर होती, मुंबईतील मराठी जनतेने शिवसेना उबाठा व मनसे यांच्या मराठीच्या मुद्द्याला गृहीत धरले, मुंबईत ठाकरे बंधूंना हार पत्करावी लागली.




